Download App

फडणवीसांच्या कपटकारस्थानावर आज शिक्कामोर्तब; सुषमा अंधारेंचा घणाघात

Sushma Andhare On Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis)निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बाजूने लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे महाराष्ट्रात हे सरकार कपट, कटकारस्थान करुन स्थापित झालेले आहे. या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांनी कपट, कारस्थान रचलं. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या लिहिण्यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं; ठाकरेंच्या राजीनाम्यावर पवारांची प्रतिक्रिया

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत, ती आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. राज्यपालांचं वर्तन व्यवहार प्रचंड चुकीचा होता. देवेंद्र फडणवीसांचा अवाजवी, बेकायदेशीर हस्तक्षेप यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. पक्ष म्हणून दावा करु शकत नाहीत. या चारही निरीक्षणाचा विचार केला तर हे सरकार बेकायदेशीर स्थापित झालेले आहे, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

अंधारे म्हणाल्या की, अशा बेकायदेशीर सरकारला आज जे होणार होतं ते काही दिवसांनी होईल. त्यांना बचाव करण्यासाठी आणि काही काळ मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे महाराष्ट्रात हे सरकार कपट, कटकारस्थान करुन स्थापित झालेले आहे. या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कपट, कारस्थान रचलं. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यपालांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नसतात, हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. राज्यपाल पक्षपाती भूमिका घेत होते, असेही यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.

आजच्या निकालात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा हा मुद्दा यामध्ये महत्वाचा ठरला आहे. त्याचवेळी राज्यपालांच्या भूमिकेवर देखील ताशेरे ओढले आहेत.

Tags

follow us