Sushma Andhare : ‘तेव्हा का बरं असे फतवे काढले नाही?; पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर सुषमा अंधारेंचा घणाघात

Sushma Andhare on Purushottam Khedekar : नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Temple)) वेदोक्त प्रकारावरून छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिता राजे भोसले (Sanyogita Raje Bhosale) यांच्यासोबत जो प्रकार घडला, त्याचा काही दिवसांपूर्वी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी निषेध केला होता. सर्व मंदिरे हे ब्राम्हणपुजारी मुक्त करून मदिरांचे राष्ट्रीयीकरण, करा अशी भूमिका […]

Untitled Design   2023 04 13T082529.340

Untitled Design 2023 04 13T082529.340

Sushma Andhare on Purushottam Khedekar : नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Temple)) वेदोक्त प्रकारावरून छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिता राजे भोसले (Sanyogita Raje Bhosale) यांच्यासोबत जो प्रकार घडला, त्याचा काही दिवसांपूर्वी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी निषेध केला होता. सर्व मंदिरे हे ब्राम्हणपुजारी मुक्त करून मदिरांचे राष्ट्रीयीकरण, करा अशी भूमिका खेडेकर यांनी घेतली होती. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही सांगता की, ब्राम्हणमुक्त मंदिरं झाली पाहिजे. पण जेव्हा इथल्या दलितांना मंदिरात प्रवेश नाकारले गेले. तेव्हा तुम्ही का बरं असे फतवे काढले नाही, तेव्हा त्यावर का लिहिल्या बोलल्या गेलं नाही, असा सवाल अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपण भाष्य करतांना आपल्या हे जरा लक्षात यावे, की ज्या चळवळीतल्या माणसाने तात्काळ म्हटलं की, ब्राम्हणमुक्त मंदिर व्हावे. तर अनके अशी मंदिरे आहेत, ज्याच ब्राम्हण पुजारी नाहीत. किंवा तेथे बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण आहे. मग ते जेजुरीचं मंदिर, तुळजाभवानीचं मंदिर असेल तिथं सरकारचं नियंत्रण आहे. पण प्रश्न असा आहे की, ही गोष्ट तुम्हाला संयोगिता राजेंना अडचणती आल्यावर सुचते, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी खेडेकरांच नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

अंधारे यांनी सांगिलते की, तुम्ही सांगता की, ब्राम्हणमुक्त मंदिरं झाली पाहिजे. पण जेव्हा इथल्या दलितांना मंदिरात प्रवेश नाकारले गेले. किंवा चुकून एखादा नवरदेव मंदिराच्या पारावर गेल्यानं त्याला बेदम मारहाण झाली. तेव्हा तुम्ही का बरं हे फतवे काढले नाहीत. जेव्हा अनुसूचित जाती-जमातीलल्या अनेकांची नाकेबंदी, दमनशाही केली गेली. तेव्हा त्यावर का लिहिल्या बोलल्या गेलं नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी खेडकरांना केला.

Nitin Gadkari Threat : आरोपी जयेश पुजारीवर युएपीए कायद्यांतर्गत कारवाई…

यावेळी बोलतांना सुषमा अंधारे यांनी माध्यमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, संयोगिता राजेंसोबत जे घडल त्याचं आम्ही समर्थन करतच नाहीत. ते वाईटच झालं. पण, अख्या मीडियात संयोगिता राजेंसोबत घडलेली घटना दाखवली जाते. दाखवायलाच पाहिजे. पण, आमचे हजारो दलित-उपेक्षित भावडांना आजही मंदिरात प्रवेश दिले जात नाहीत. त्यावर कधी काही बोलणार का? का ती लोकं माणसं नाहीत? असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.

राम नवमी निमित्त संयोगिताराजे भोसले यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी मंदिरात पुजा केली. या पुजेवरून वाद निर्माण झाला होता. मंदिरातील महंतानी पूजा पुराणोक्त पध्दतीने करण्यास सुरूवात केल्यानंतर संयोगिता राजे यांनी पुजेला विरोध केला होता. त्यांनी महंतांना पूजा वेदोक्त पध्दतीनं करण्यास सांगितलं. मात्र, वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न महंतांनी केल्याचा दावा संयोगिता राजे भोसले यांनी केला. त्यांनी याबातची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यानंतर मराठा सेवा संघाने या प्रकरणात उडी घेत खंबीर भूमिका घेतली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी राज्यातील सर्व मंदिरामधून ब्राम्हण पुजारी हटवण्यची मागणी केली. संयोगिता राजे यांच्यासोबत गैरव्यववहार झाला. त्यामुळं पंढरपूरसारखे राज्यातील सर्व मंदिरे ही भटमुक्त करून मंदिराचं राष्ट्रीयीकरण करा, त्यामुळं पुराणोक्त आणि वेदोक्त वाद संपेल, अशी भूमिका खेडेकर यांनी घेतली होती.

 

Exit mobile version