Nitin Gadkari Threat : आरोपी जयेश पुजारीवर युएपीए कायद्यांतर्गत कारवाई…

Nitin Gadkari Threat : आरोपी जयेश पुजारीवर युएपीए कायद्यांतर्गत कारवाई…

Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यलयातील धमकीच्या फोन प्रकरणी युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर विरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्ह्याची दाखल करण्यात येणार आहे.

2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांच्या येणार ‘एवढ्या’ जागा?

आरोपी पुजारी जयेशचे पीएफआयशी संबंध असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. तसेच शाकीरचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तसेच दाऊद इब्राहीमपर्यंत जात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाल्याने त्याच्यावर युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Deepika Padukone’s Selfie: दीपिकाची कुटुंबासोबत भूतान भटकंती; चाहत्यांसोबत क्लिक केले सेल्फी

बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देणे

ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने दिली होती. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी याने बऱ्याच आधी धर्म परिवर्तन केले असून धर्म परिवर्तनानंतरचे त्याचे नाव शाकीर असल्याची माहिती एबीपी माझा ने समोर आणली होती. तसेच त्याचे काही कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आणले होते.

स्वत: मोदी शरद पवारांना मानतात, तर हे कोण; सावंतांचा शिंदे गटाला टोला

दरम्यान, जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआयशी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. एवढेच नाही तर तो दाऊद इब्राहिम आणि श्रीलंकेतील LTTE सोबतही संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळं या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जयेश पुजारी उर्फवर शाकीर विरोधात यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे ठरवले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube