स्वत: मोदी शरद पवारांना मानतात, तर हे कोण; सावंतांचा शिंदे गटाला टोला

स्वत: मोदी शरद पवारांना मानतात, तर हे कोण; सावंतांचा शिंदे गटाला टोला

Uddhav Thackeray Meet Sharad Pawar :  ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या भेटीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावरुन त्यांच्यावर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याला अरविंद सावंत यांनी उत्तर दिले आहे.

Sheetal Mhatre : लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी…

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. एका ज्येष्ठ नेत्याला भेटणे यात काहीही चूक नाही. जे आमच्यावर टीका करत आहेत, त्यांनी आधी स्वत: कडे पहावे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणतात की, मी शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात आलो. त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आपल्या नेत्यांना विचारावे. त्यांचे नेते मोदी हे बारामती व शरद पवारांच्या कार्यक्रमाला येतात, हे कसे चालते, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणुक आयोगाने काढून घेतला आहेय. त्यावर देखील सावंतांनी भाष्य केले आहे. निवडणूक आयोग ही एक विकाऊ संस्था आहे. त्यांनी आमचा धनुष्यबाण व पक्षाचे नाव हे कोणत्या आधारावर काढून घेतले, हे सांगितले नाही. फक्त त्यांच्याकडे 40 आमदार आहेत, म्हणून त्यांना पक्षाचे नाव दिले गेले, असे म्हणत त्यांनी निवडणुक आयोगावर देखील टीकास्त्र डागले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube