Download App

आठवण करून द्यावी म्हटलं; बाकी काही नाही, सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य काढलं उकरून

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे.

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare on Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीचा उद्या निलकाल लागणार आहे.  त्याअगोदर राजकारण तापलं आहे. दरम्यान, महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. समविचारी पक्षांना आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांना सोबत घेण्यासाठी (Sushma Andhare) दोन्हीकडून फोनाफोनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या निकालानंतर काय स्थिती असेल याबाबत चांगलीच उत्सुकता ताणली गेली आहे.

एकही जण पडणार नाही

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचे जुने वक्तव्य समोर आणलं असून, त्या वक्तव्यावरून त्यांना सहज आठवण करून द्यावी, असं म्हटलं आहे. बाकी काही नाही असं म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण ट्विट करून दिली आहे. त्यामुळे निकालापूर्वीच सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नोटिशीला घाबरत नाही, निष्पापांना न्याय मिळाला पाहिजे, सुषमा अंधारेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल 

राज्यामध्ये एक्झिट पोलमध्ये बरीच संभ्रमावस्था असली तरी महायुतीला कौल दिला आहे. मात्र, यामध्ये शिंदे यांच्या अपेक्षेनुसार जागा येत नसल्याचे चित्र एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. दुसरीकडे अजित पवार गटालाही अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याचं चित्र समोर येत आहे. एक्झिट पोलमध्ये काही जरी असलं तरी महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. निवडणूक जिंकल्याचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर तातडीने मुंबईला येण्याचं आदेशही देण्यात आले आहेत.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांना सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणणारच आणि आमच्या शिवसेना-भाजप युतीने २०० जागा जिंकल्या नाहीत तर मी राजकारण सोडून शेतावर जाईन, असं शिंदे म्हणाले होते. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण पक्षातील काही नेत्यांनी खोडा घातला, असं म्हणताना शिंदे यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. तुम्हालाच मुख्यमंत्री करणार होते, पण तुमच्या पक्षातून विरोध झाला, आमचा विरोध नव्हता असं नंतर एकदा मला अजित पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं म्हणत शिंदे यांनी पवार यांच्याकडंही बोट दाखवलं.

follow us