Sameer Gaikwad Death : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. समीरचा सांगलीतील त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे. पुरोगामी नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांची 15 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात समीर संशयित आरोपी होता. सध्या तो जामीनावर बाहेर होता.
16 सप्टेंबर 2015 रोजी समीरला गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. एआयटीकडून त्याच्याविरोधात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. कोल्हापूर सत्र न्यायालयाने (Kolhapur Sessions Court) काही दिवसांपूर्वी त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने लागू केलेल्या जमिनाच्या अटींचे उल्लंघन समीर गायकवाडकडून करण्यात आले नाही असं सांगत जामीन रद्द करण्याची सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.
मोठी बातमी! कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणात कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव निलंबित
नेमकं प्रकरण काय?
15 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे पुरोगामी नेते आणि विचारवंत गोविंद पानसेर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 20 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात 12 आरोपींची नावे समोर आली होती. त्यापैकी 10 जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहे. याच प्रकरणात समीर गायकवाड याला देखील अटक करण्यात आली होती.
मुंबई महापौर पदासाठी तडजोड करु नका; दिल्ली नेतृत्वाचे भाजप नेत्यांना आदेश
