Ranjit Kasle Dismissed from Police Department : निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांना काल बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रणजित कासलेला पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट येथून ताब्यात घेतलं आहे. (Kasle) कासलेने मी शरण जाणार असल्याचा व्हिडिओ केला होता. मात्र, त्यापुर्वीच त्याला ताब्यात घेण्यात बीड बोलिसांना यश आलं आहे. बीड पोलिसांच पथक पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, कासले यांच्याबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.
कासले पोलीस सेवेतून बडतर्फ
पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी कासले यांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११(२)(ब) अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी बीड पोलिसांनी त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक २१३/२५ अंतर्गत, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१) (र) अन्वये ताब्यात घेतलं आहे.
मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात, पुण्यात बसला होता लपून
कासले हे काल दिल्लीहून पुण्यात आला होता. तो स्वारगेटमधील एक हॉटेलमध्ये मुक्काम करत होते. आज पहाटे बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. रणजि कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे एन्काऊंट करण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
बँक स्टेटमेंट
रणजित कासले यांनी काल पुण्यात आल्यावर पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले यांनी केला. त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवलं होतं.