Buldhana : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणी चार शिक्षकांचे निलंबन

Buldhana HSC Paper Leak :  काही दिवसांपूर्वी बारावीचा गणिताचा पेपर फुटला होता. याप्रकरणी आता चार शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुलढाणा ( Buldhana )  जिल्ह्यातील सिंदखेड राजा या भागात घडली आहे. या पेपरफुटीचे पडसाद थेट विधानभवनात पडले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar )  यांनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 09T105735.090

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 09T105735.090

Buldhana HSC Paper Leak :  काही दिवसांपूर्वी बारावीचा गणिताचा पेपर फुटला होता. याप्रकरणी आता चार शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुलढाणा ( Buldhana )  जिल्ह्यातील सिंदखेड राजा या भागात घडली आहे. या पेपरफुटीचे पडसाद थेट विधानभवनात पडले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar )  यांनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला होता. तसेच माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील या पेपरफुटी प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरले होते.

या घटनेत एकुण सात जणांना अटक करण्यात आली होती. यातील चार जण हे शिक्षक होते. त्यांचे आता निलंबन करण्यात आले आहे. बुलढाणा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ही कारवाई केली आहे. ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली ते सर्व शिक्षक विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.

जे विद्यार्थी कॉपी करतात त्यांच्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकणात गजानन आडे व गोपाल शिंगणे हे दोघे जण स्वत: शिक्षण संस्थेचे संचालक असून तिथेच शिक्षक म्हणून काम करत होते.

राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, फडणवीस बजेटमध्ये ‘रंग’ आणणार?

या कॉपी प्रकरणात मदत करणाऱ्या चारही शिक्षकांना आधी अटक करण्याता आली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते आहे. या प्रकरणामध्ये त्यांची शिक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या प्रकरणानंतर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे कोणी या प्रकरणात दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असे सांगितले होते. तसेच राज्यात सध्या कॉपीमुक्त अभियान सुरु आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होणार नाही, याबाबत शासन काळजी घेईल, असे विखे म्हणाले होते.

Exit mobile version