Download App

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आज राज्यभर चक्काजाम आंदोलन

मुंबई : शेतकरी (Farmers) प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन स्वाभिमानी संघटनेकडून आज राज्यभर चक्काजाम आंदोलन (Agitation) केलं जाणारंय. आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणारंय. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti)यांनी केलाय.

शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, शेतीपंपाचे वाढीव प्रास्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी संघटना आक्रमक झालीय.

MPSC Student Protest : लेखी आदेश निघेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका

त्याचबरोबर बुलढाण्यात (Buldhana) शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी केलीय.

वीज दरात करण्यात येणारी 37 टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे, ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी अशी मागणी स्वाभिमानीनं केली आहे. रात्री वीज दिल्यामुळं जंगली जनावरं आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होतो. त्यामध्ये शेतकऱ्यांचा बळी जातो. त्यामुळं शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी अशी मागणी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणारंय. यामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. तसेच बुलढाण्यातही सकाळी 11 वाजता मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट-बकाल येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय.

Tags

follow us