दिल्लीतील संसदेत आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातील सात दिग्गज नेत्यांचा समावेश

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांनंतर विविध राज्यांतील दिग्गज नेते आज सभागृहात प्रवेश करत औपचारिकरित्या आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Untitled Design 50

Untitled Design 50

Swearing-in ceremony of newly elected Rajya Sabha members : दिल्लीतील संसद भवनात आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, देशभरातील राजकारणाचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांनंतर विविध राज्यांतील दिग्गज नेते आज सभागृहात प्रवेश करत औपचारिकरित्या आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सात सदस्यांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, तसेच रामराव वडकुते, माया ईवनाते आणि ज्योती वाघमारे यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांचा आजच्या शपथविधी सोहळ्यात सहभाग असणार आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या नव्या सदस्यांना शपथ दिली जाईल. संसदेतील या प्रक्रियेनंतर नव्या सदस्यांची विधिमंडळातील अधिकृत कारकीर्द सुरू होईल.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा शपथविधी 10 एप्रिल रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून आलेले पार्थ पवार हे 9 एप्रिल रोजी शपथ घेणार आहेत.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य

विनोद तावडे – भाजप (महायुती)
रामदास आठवले – भाजप (महायुती)
माया चिंतामण ईवनाते – भाजप (महायुती)
रामराव वडकुते – भाजप (महायुती)
ज्योती वाघमारे – शिवसेना (शिंदे गट)
पार्थ पवार – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
शरद पवार – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट, महाविकास आघाडीचा पाठिंबा)

या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यसभेतील राजकीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व वाढल्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात राज्याशी संबंधित मुद्द्यांवर अधिक प्रभावीपणे मांडणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version