सर्व सामान्यांची पुन्हा परवड! राज्यातील तहसीलदारांनी उपसलं संपाचं हत्यार

Tahasildar Strike In Maharashtra : राज्यातील सर्व सामान्य जनतेची पुन्हा एकदा परवड होणार असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. कारण, संपूर्ण राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आजपासून बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. MVA Sabha : आवर्जून पुढे बोलावत उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना दिला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (37)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (37)

Tahasildar Strike In Maharashtra : राज्यातील सर्व सामान्य जनतेची पुन्हा एकदा परवड होणार असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. कारण, संपूर्ण राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आजपासून बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MVA Sabha : आवर्जून पुढे बोलावत उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना दिला ‘तो’ मान

वाढीव वेतनश्रेणी बाबतच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणण असून, गेल्या तीन महिन्यापासून सरकारकडे मागणी करूनही दुर्लक्ष केल्याचे कर्मचाऱी सांगत आहे. विविध मागण्याांसाठी जिल्हा मुख्यालयी सर्व तहसीलदार नायब तहसीलदार एकत्र येणार असून, संघटनेच्या राज्य पदाधिकारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुपारी 12 वाजता भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर संपाची दिशा कशी असेल याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

संभाजीनगरच्या सभेत इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांची खुर्ची मोठी; मविआचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे ?

नेमक्या मागण्या काय?  

राज्यभरातील सुमारे 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदारांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन दिले जाते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची मागणी नायब तहसीलदारांकडून केली जात आहे. वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास राज्यातील 2200 पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना फायदा होणार आहे. मात्र, ही मागणी मान्य झाल्यास सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष 2.64 कोटींचा बोजा वाढणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar : निवडणुका पुढे ढकल्यासाठी भाजप दंगली घडवतयं, संजय राऊतांचा आरोप

संपाचा कशावर होणार परिणाम?

दरम्यान, नायब तहसीलदार आणि तहसीलदारांनी पुकारलेल्या संपाचा विविध गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक फटका सर्व सामान्य नागरिकांना बसणार आहे. याशिवाय शेतकरी आणि विद्यार्थांचीदेखील यामध्ये परवड होणार आहे. संपाुमळे नुकत्याच पडून गेलेल्या अवकाळी पावसाुमळे होणाऱ्या पंचनाम्यांवरदेखील परिणाम होणार आहे. यामुळे आता हा संप मोडून काढण्यात सरकारला यश येते  की, संपामुळे कामकाज ठप्प पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version