MVA Sabha : आवर्जून पुढे बोलावत उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना दिला ‘तो’ मान

MVA Sabha : आवर्जून पुढे बोलावत उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना दिला ‘तो’ मान

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी महापुरूषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. प्रत्येक नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून महापुरूषांच्या प्रतिमांचं पूजन केलं.

या प्रतिमा पूजनावेळी महापुरूषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेच देखील पूजन करण्यात आलं. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. यावेळी मात्र शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना पुढे बोलावत मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेच पूजन करण्याचा मान दिला.

नाना पटोले यांचे विमान आले, पण नाना आलेच नाही; नाना नाराज का?

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीमंचावर उपस्थित असलेल्या महिला नेत्याला देखील मान दिला. तसेच ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील एक प्रभावी महिला नेत्या म्हणून त्यांचं महत्त्व यावेळी अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi degree) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube