Download App

वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेवर वार

हे आरोपपत्र 29 नोव्हेंबरपासून पुढचे घेतले आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीने 28 मे रोजी दाखल केला होता.

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेला आरोपपत्रातून समोर आलं आहे. (Santosh Deshmukh) ॲट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख आरोपपत्रातून करण्यात आला आहे. यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या दिवशी घडली हत्या झाली त्यानंतर पहिल्या तासातच मी मीडियासमोर येऊन बोललो होतो की, या प्रकरणातील मास्टरमाइंड पकडला पाहिजे. ही अतिशय निंदनीय घटना घडली आहे. त्याची स्पष्टता आज होत आहे. मी हे वारंवार सांगत होतो की, याचा मास्टरमाइंड परळीला बसायचा. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दहशत निर्माण केली होती. वाल्मिक कराड परळीत येऊन बसायचा आणि वाल्मिक कराडला सपोर्ट कोणाचा असणार हे जगजाहीर आहे. वाल्मिक कराडने गोरगरीब लोकांना त्रास देणं, त्यांच्याकडून खंडणी गोळा करणं आणि आपली दहशत निर्माण करणं, असे प्रकार केलेत.

रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा

हे आरोपपत्र 29 नोव्हेंबरपासून पुढचे घेतले आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीने 28 मे रोजी दाखल केला होता. तो सुद्धा यात घेतला पाहिजे. तो सुद्धा असाच प्रकार आहे. त्यातील जो आरोपी आहे तो सुद्धा यांचाच साथीदार आहे. इथे सर्व गुंड माफिया फिरत आहेत, ते सुद्धा या प्रकरणात घेतले पाहिजे. त्यांनी प्रत्येक तालुक्याला एक एक माणूस नेमला होता. धाराशिवमधील कळम, परंडा, भूम तालुक्यात देखील यांची माणसं आहेत. सत्तेचा गैरवापर करणे, पदावर बसवलेल्या पोलिसांचा फायदा घेणे. मर्जीतले अधिकारी बीडमध्ये आणून बसवणे, असे प्रकार सुरू होते.

गेल्या पाच वर्षात फार मोठी दादागिरी, गुंडगिरी, दहशत बीडमध्ये पसरली होती. हे प्रकरण 28 मे पासून सुरू झालेले आहे. मात्र, ते प्रकरण तिथेच दाबले गेले. सीसीटीव्ही मध्ये आणखी दोन-चार जण आढळून आलेले आहेत. ते आरोपीला पळून जाण्यासाठी साथ देत होते, त्यांना देखील सह आरोपी केले पाहिजे. आज या घटनेतील मास्टरमाइंड समोर आलेला आहे. त्याला कोण रसद पुरवत होता, त्याला कोणाचा आशीर्वाद होता, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

follow us