Video: ..तर दत्ता गाडे मृतावस्थेत सापडला असता; पुणे पोलिसांचा ‘तो’ मानेवरील जखमांच्या उल्लेख काय?

Pune Swargate Rape Case : पुणे येथील स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये झालेल्या बलात्काराची घटना घडली. (Pune Police) त्यातील आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळण्यात. या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून त्याची माहिती आज (दि. 28 फेब्रुवारी)रोजी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
दोरी तुटल्यामुळे वाचला
पुणे पोलीस आयुक्त म्हणाले, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत. या वळानुसार त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असं आरोपीने सांगितलं आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा जीव वाचला अशी खळबळजनक माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. तसंच, आरोपी दत्ता गाडे विषारी किटकनाशक पिऊनही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितले जात आहे.
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
आरोपीने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचं पथक तिथे पाठवण्यात येणार आहे. परंतु, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते, अशी माहिती स्वत: आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी दिली आहे. त्यांच्या या माहितीनंतर आता या प्रकरणाला वेगळ वळण लागण्याची शक्यता आहे.
स्थानिकांचा सत्कार का?
स्वारगेट बसस्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोध घेतला. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याबद्दल मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार असंल्याचंही अमितेश कुमार म्हणाले आहेत.