Download App

Tanaji Sawant-Ranajagjeetsinh Patil Controversy : भाजप अन शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

  • Written By: Last Updated:

उस्मानाबाद : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात पैठण या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात देखील असाच प्रकार समोर येत आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप नियमानुसार करत नाही, अशी तक्रार भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjeetsinh Patil) यांनी थेट राज्याच्या नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद आता हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागला आहे. परिणामी उस्मानाबाद जिल्ह्यात तानाजी सावंत विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या पण जिल्हा पातळीवर एकमेकांमध्ये वाद असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्री आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर येवू लागले आहेत. राणाजगजितसिंह पाटील यांनी पाठवलेल्या पत्राची तातडीने दखल घेत प्रधान सचिव कार्यालयाने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुद्देनिहाय सविस्तर माहिती पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे वाटप नियमानुसार करत नाही, अशी तक्रार केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी राणा पाटील यांनी या संदर्भातील पत्र आणि निधीवाटपात केलेला भेदभाव याच्या पुराव्यांच्या यादीसह मंत्रालयात पाठवले. या पत्राची दखल घेत प्रधान सचिवांना उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सविस्तर माहिती पाठवावे, असे म्हटले आहे.

follow us