Tanaji Sawant On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी लोक माझा सांगातीतून केलेल्या गौप्यस्फोटाविषयी बोलताना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पवारसाहेबांनी स्वतःच्या पक्षाविषयी मत व्यक्त करावे. भाजप-शिवसेनेने वकिलपत्र दिले नाही आम्ही सक्षम आहोत, असे म्हणत तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला दिला. सावंत जिल्हाधिकारी कार्यालयातील खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आगामी खरीप हंगामात बियाणे, खत, औषधे कमी पडणार नाहीत, असे आश्वासन यावेळी सावंतांनी दिले.
झालेल्या बाजार समिती निवडणुका म्हणजे सत्ता बदलाची नांदी असे वावडे मिडीया उठवत आहे. मात्र ज्या निवडणुका कधी होतात हे माहित होत नव्हते. त्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळाले आहे, असे म्हणत भाजपा 2 खासदारांहून 302 वर गेल्याचे सावंतांनी सांगितले.
अजितदादा भाजपा प्रवेशावर बोलताना आम्ही विचार करत नाही. आगामी निवडणुकीत आम्हाला चांगलं यश येईल, असे सावंत म्हणाले. भविष्यात स्वाईन फ्लुचा व्हायरस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून त्यावर उपाययोजना सुरू असल्याचे देखील आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.