Download App

Osmanabad Politics : खासदार ओमराजेंच्या खांद्यावर तानाजी सावंतांचा हात…

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे गटाचे दिग्गज नेते एकत्र आल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास आणि पाटील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सांवंत एकत्र पाहायला मिळालेत. यावेळी तानाजी सावंतांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खांद्यावर हात ठेवला तर दुसऱ्या बाजूला आमदार कैलास पाटील उभे होते. तिन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे आगामी काळात उस्मानाबादेतून ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चिन्हे दिसून आलेत.

एकंदरीत या चित्रावरुन ठाकरे आणि शिंदे गटाच्या या नेत्यांच्या नव्या मैत्रीचा नेमका काय अर्थ काढायचा? तिन्ही दिग्गज नेते एकत्र भेटल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलंय. नुकताच निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केलं आहे. त्यानंतर अनेक नेते ठाकरे गटातून शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातंय. अशातच या तिन्ही नेत्यांच्या भेटीने चर्चा रंगल्यात.

राजे आमचे प्रतिनिधित्व करा : शिवभक्तांची संभाजीराजेंना आर्त हाक…

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील कट्टर शिवसैनिक मानले जात असून ते उध्दव ठाकरे यांचे एकनिष्ठ मानले जातात. या तिन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Ulhas Bapat : ‘SC चा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ही मोठी चूक’

शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटाच्या गोठ्यात जाण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आज शिवजयंतीनिमित्त खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यात जवळीक असल्याचं दिसून आलं आहे.

Ind VS Aus 2nd Test : अक्षर पटेलची एकाकी झुंज, 74 धावा करत सावरला भारताचा डाव

ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि गुवाहाटीला जात होते, तेव्हा रस्त्यात बसमधून उतरुन आमदार कैलास पाटील ठाकरेंच्या गोठ्यात आले होते. तर विधानसभेने अपात्र केलेल्या 16 आमदारांमधील एक आमदार तानाजी सावंत आहेत.

तसेच एकीकडे भाजपचे आमदार जगजितसिंह राणा यांनी तानाजी सावंत आपल्या मतदारसंघात निधी देत नसल्याचा आरोप करीत आहेत, तर दुसरीकडे आजची सावंत, पाटील आणि निंबाळकरांची ही भेट. त्यांच्या या भेटीनंतर तिघांचे घनिष्ठ संबंध असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना या तिघांची मैत्री मान्य आहे काय? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us