राजे आमचे प्रतिनिधित्व करा : शिवभक्तांची संभाजीराजेंना आर्त हाक…
शिवनेरी : शिवजन्माचं ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे किल्ले शिवनेरी गडावर उपस्थित असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)यांना सहभागी करून न घेता शिवजन्मोत्सवाच्या शासकीय सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर गडावर उपस्थित शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त शिवभक्तांनी सरकार व पोलीस (Police)प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. त्याचवेळी राजे आमचे प्रतिनिधित्व करा, अशी शिवभक्तांनी संभाजीराजे छत्रपतींना आर्त हाक दिली.
शासकीय कार्यक्रम सुरु असल्यामुळं त्यावेळी शिवगडावर शिवप्रेमींना जाण्यापासून अडवण्यात आले. त्या ठिकाणी शिवप्रेमींना अडवल्यामुळं संभाजीराजे छत्रपती नाराज झाले आहेत. त्यानंतर राजे छत्रपतींनी स्टेजवर जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच माईक हाती घेत छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला सुनावले.
Shiv Jayanti 2023 : आग्र्याच्या किल्ल्यात भव्य शिवजयंती, विविध कार्यक्रमांचं आयोजन
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, किल्ले शिवनेरीवर येत असताना मला शिवभक्तांनी अडवलं. तेव्हा त्यांनी मला विचारलं, की व्हीआयपी पासेस का? आम्ही सुद्धा शिवभक्त असून आम्हाला अडवलं जात आहे. तुम्ही दर्शन घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येणार असं त्यांनी मला सांगितलं.
तुम्हाला शासकीय कार्यक्रम करायचा असेल तर करा पण दुजाभाव नको. वर येऊन दर्शन घेऊ दिलं जात नाही हे चालणार नाही. दरवर्षी हेच होत आहे. आम्ही किती सहन करायचे? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा दुजाभाव करु नका, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांना दिला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र, राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार अमोल कोल्हेंनी या शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घातलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्यानं आपण शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडावरून निघून गेले की, आपण गडावर जाऊन दर्शन घेणार असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय.