Shiv Jayanti 2023 : आग्र्याच्या किल्ल्यात भव्य शिवजयंती, विविध कार्यक्रमांचं आयोजन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj)यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra)आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन (Ajinkya Devagiri Foundation) यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
मराठेशाहीत आग्र्याचा किल्ला आणि औरंगजेब या दोन गोष्टी कायमच चर्चेत राहिल्या आहेत. ज्या औरंगजेबानं शिवरायांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांनी तितक्याच चालाखीने आग्र्याच्या किल्ल्यातून आपली सुटका केली, त्याच आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवरायांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे.
Amit Shah : निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं
भारतीय पुरातत्व विभागानं त्याला परवानगी दिली आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा रविवारी (19 फेब्रुवारी) आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये गुंजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.