Amit Shah : निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं

  • Written By: Published:
Amit Shah : निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं

पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला काल शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या निकालावर भाष्य केलं.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. त्यावर बोलतांना अमित शहा म्हणाले की, निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा जिंगण्यचा आपल्याला निर्धार करायचा आहे.

आज मोदी@२० या मराठी अनुवादीत पुस्तकाचा अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

मोदी @20 या पुस्तकाबद्दल बोलतांना अमित शहा म्हणाले की, लोकांना मी अपिल करतो की देशाची लोकशाही कशी यशस्वी झाली, हे पाहायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. हे पुस्तक मोदीजींच्या जीवनावर आधारित नसून, भाजपची यशोगाथाही नाही. पण हे पुस्तक भारतातील समस्यांचे निराकरण, असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

शहा म्हणाले, एक व्यक्ती सगळ्या गोष्टी त्यागून पक्षासाठी आपले सर्वस्व देतो. राष्ट्रीय स्वयं संघाच विचार समाजात रुजपवतो. तसेच गरिबांचे समस्या शोधतो आणि त्याचे निरसन करतो, ही मोठी गोष्ट आहे. मोदी हे गुरजातचे मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांनी कोणतीही निवडणूक लढली नव्हती. मोदी हे कधी ही सरपंचपदासाठी लढले नाहीत पण कामाच्या जोरावर त्यांना मुख्यमंत्री पदासाठी लढायला पक्षाने संधी दिली.

त्यांच्या मनात किती प्रश्न असतील विचार करा. मात्र लोकांच्या समस्या सोडवण्याची कला त्यांच्याकडे आहे. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले. गरिबांच्या सेवा आणि भारत मातेची सेवा हाच मोदीच्या जीवनाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

मोदींनी गुजरातचा विकास त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केला. त्याचा मी साक्षीदार आहे. ग्रामीण विकासाचे अध्याय आधी गुजरातमध्येच लिहिले गेले. विविध प्रकारचा विकास केला गेला. दहशतवादाला उत्तर दिलं गेलं. त्यामुळे मोदीजी १३ वर्षात एक आदर्श ठरत गेले, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.

मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा आपल्या कार्यातून देश प्रगती करु शकतो आणि संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो हे शक्य आहे हे मोदींनी दाखवून दिलं. हा काळ भारताच्या राजकीय इतिहासातला सुवर्ण काळ आहे.

त्यांना आता बाळासाहेबांचा मुखवटा लावून नाचावं लागतंय, संजय राऊतांची BJP वर टीका

७० वर्षे ज्या लोकांनी राज्य केलं त्यावेळी लोक त्रास आणि समस्यांना सामोरे जात होते. मात्र आज ती स्थिती नाही. गरीबांना घरं दिली गेली आहेत. गॅस दिला गेला आहे. मोदींच्या काळातच हे शक्य झालं आहे असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह  संघटन मंत्री जयप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube