त्यांना आता बाळासाहेबांचा मुखवटा लावून नाचावं लागतंय, संजय राऊतांची BJP वर टीका

  • Written By: Published:
Untitled Design (6)

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निकाल नंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह देखील मिळाले या नंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले…भाजपला बाळासाहेबांच्या मुखवट्याचा वापर करावा लागतो तसेच धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.

त्यांना हा धनुष्यबाण चोरण्यासाठी महाशक्तीने मदत केली आहे. लवकरच आम्ही जनतेसमोर याबद्दल माहिती आणू ज्यांनी हे कृत्य केले आहे, यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, त्यांनी जी चोरी केली आहे त्याबद्दल लोकांमध्ये रोष आहे. पत्रकारांनी विचाले तुमचे काही खासदार, आमदार शिंदे यांच्याकडे जाणार आहेत यावर संजय राऊत म्हणाले आमचं कोणी कुठे जात नाही.

Ajit Pawar : पक्षात कोण कणखर नेता आहे, यावरच जनता विश्वास ठेवते

संजय राऊत आज कोकण दौऱ्यावर होते. मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत
संवाद साधला. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगानं शुक्रवारी एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. विरोधी पक्षातील नेत्यांनी या निर्णयाला अनपेक्षित निर्णय म्हटलं. तर भाजपकडून याचं स्वागत करण्यात आले. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाकडून आता नवीन पक्षचिन्ह मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. संजय राऊत यांनी शनिवारी याबाबत सूचक वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, “आजच मी कोकणात जाऊन आलो आहे. तेथील कार्यकर्त्यांसोबत बोलणं झालं असून नवीन चिन्हाबाबत आमची चर्चा सुरू आहे. ”

चोरांना ही चोरी पचणार नाही, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल –

संजय राऊत यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. “अलीकडे महाराष्ट्रात मंदिरांवर दरोडे पडत आहेत. या दरोड्यांमध्ये मंदिरांचे कळस आणि मुर्त्यांची चोरी होत आहे. परंतु, आमच्या मंदिरातून धनुष्यबाणाची चोरी झाली आहे. परंतु, लवकरच आम्ही या चोराची माहिती काढणार आहोत. चोरांना ही चोरी पचणार नाही. लोक यांना धडा शिकवतील, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला.

 

 

 

 

 

 

 

 

Tags

follow us