Ajit Pawar : पक्षात कोण कणखर नेता आहे, यावरच जनता विश्वास ठेवते
पिंपरी चिंचवड : चिंचवड आणि कसबा (Chinchwad and Kasba) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवार असलेल्या नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपवर हल्लाबोल करत शिंदे गटावर निशाना साधला.
मागील काही महिन्यांपासून शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह यावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने काल एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय दिला. त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. त्यातच अजित पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाबाबत सूचक विधान केलं.
ते म्हणाले, पक्षात कोण कणखर नेता आहे, यावरच जनता विश्वास ठेवते. पक्ष हा नेतृत्वावर चालत असतो. काँग्रेस पक्ष गांधी नेहरू यांच्या करिश्म्यावर चालतो. भाजप मोदी आणि शहा यांच्या करिश्म्यावर चालतो. आमच्या पक्षात शरद पवार यांच्यामुळे पक्षाला पाठिंबा मिळत आहे. तसेच शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळेच वाढत आहे. त्यामुळे आता त्यांच्या पक्षाला जे चिन्ह मिळेल, ते जनतेपर्यंत पोहचेल आणि जनता त्यांच्या पाठिशी उभी राहील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
मोठी बातमी : अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांना चकवा देत एक व्यक्ती घुसला ताफ्यात…
ते चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. ते म्हणाले, निवडणूक आयोगाचा कालचा निर्णय हा अनपेक्षित आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकार ठाकरे यांनी पक्षाला शिवसेना हे नाव दिले, याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर पक्ष कसा वाढला, हे सर्वांना माहित आहे.
महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. तसेच स्वतः बाळासाहेबांनी शिवसेनेची सूत्रे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती. ज्यांनी शिवसेना स्थापन केली, त्यांच्या मुलाकडूनच पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेत, ज्यांनी पक्षात फूट पाडली, त्यांना हे नाव आणि चिन्ह दिले, हे धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, त्याविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जातील. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली असली तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाविकास आघाडीतील सर्व सदस्य त्यांच्यासोबत आहेत, असही त्यांनी सांगितलं. फक्त आम्हीच नाही, तर सामान्य जनता आणि शिवसेनाप्रेमी ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. याआधीही काही पक्षांसोबत अशा घटना घडल्याचं त्यांनी सांगितले आहे.
राज्यात जूनमध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं आणि नवीस सरकार स्थापन झालं आहे. हे नवं सरकार सरकार सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यास असमर्थ ठरल्याची टीकाही अजित पवारांनी केली. ते म्हणाले, मविआच्या काळात कोरोना सारखं सकंट असतांनाी आम्ही नागरिकांप्रति कर्तव्यनिष्ठ राहिलो लाथ मारील तिथं पाणी काढेल, ही धमक लोकप्रतिनिधीमध्ये असावी, याची नोदं मतदारांनी घेतली पाहिजे.
भाजपला फक्त राजकारण दिसतं. खासदार गिरीश बापटांची तब्येत नसतांनाही भाजपने त्यांना प्रचारात उतरवलं. हे दुर्दैव आहे. राजकारणापलीकडेही काहीतरी महत्वाचं असतं, हे भाजपला समजत नाही. भाजप फक्त माणसांचा वापर करते. माणसं तोडा-फोडीचं राजकारण भाजप करते. मात्र, माणसं जोडायची असतात, माणसं तोडायची नसतात, हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजप आम्ही तयार केलेले कार्यकर्त्यांना फोडत असतो. भाजपला अजूनही त्यांच्या पठडीतील कार्यकर्ते तयार करता येत नाहीत, हे दुर्दैव आहे, असंही अजित पवार यावेळी बोलले.