Download App

TCS नोकरीभरती प्रकरणी कडक कारवाई, कंपनीने 16 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

  • Written By: Last Updated:

TCS Job Scam: गेल्या तीन वर्षांत टीसीएसने (TCS ) कंत्राटी भरतीसह तीन लाख लोकांना कामावर घेतले होते. या भरती प्रक्रियेत घोटाळा (TCS Recruitment Case) करून त्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले, असा दावा करण्यात आला होता. तसेच, काही टीसीएस कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मच्या कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. दरम्यान, या प्रकरणी आता TCS ने आता नोकर भरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली. कंपनीने आपल्या 16 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

Navratri 2023 : कोल्हापूरच्या अंबाबाईची अख्यायिका आणि महती… 

या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन वर्षांत कंपनीने कंत्राटदारांसह 3 लाख लोकांना कामावर घेतले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी किमान 100 कोटी रुपये कमावल्याचाही अंदाज आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी कंपनीने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करण्यात आला आहे.

टाटा समूहाच्या आयटी कंपनीने रविवारी संध्याकाळी उशिरा या कारवाईबाबत निवेदन जारी केले. कंपनीने सांगितले की, भरती घोटाळ्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान कंपनीने 19 कर्मचाऱ्यांचा भरती घोटाळ्यात हात असल्याचं आढळले. त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले, तर 3 कर्मचाऱ्यांना रिसोर्स मॅनेजमेंट युनिटमधून काढून टाकले आहे.

के कृतिवासन यांनी टीसीएसचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आणि हे प्रकरण उघडकीस आले. सीईओ पदाची सूत्रे हाती घेताच त्यांना या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागले.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीसीएसने ही कडक भूमिका घेतली होती. जून 2023 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले आणि कंपनीने त्यावेळी तपास सुरू केला. 4 महिन्यांच्या तपासानंतर टीसीएसने आता ही कारवाई केली आहे.

तर याआधी टीसीएसने आपल्या भरती प्रमुखांना रजेवर पाठवून चार अधिकाऱ्यांना बडतर्फे कलं होतं. तर आता 16 जणांना घरचा रस्ता दाखवला आहे.

Tags

follow us