Vidhan Parishad Result : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर अखेर आज मतमोजणी पार पडणार आहे. अर्थात विधान परिषदेच्या 5 जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. या निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं असून नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या मतदारसंघांमधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पहा लाईव्ह अपडेट
