Teacher’s Day 2024 : भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा (Teacher’s Day 2024) केला जातो. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांना आजचा दिवस समर्पित आहे. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Sarvepalli Radhakrishnan) यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला होता. राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. तसेच एक महान विद्वान आणि दार्शनिकही होते. त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते. चला तर मग आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही खास गोष्टी जाणून घेऊ या..
सन 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्यांच्या काही शिष्यांनी 5 सप्टेंबर हा दिवस एखादा विशेष दिवस म्हणून साजरा करावा यासाठी राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यावेळी राधाकृष्णन म्हणाले होते की माझा जन्म दिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला त्याचा अभिमानच वाटेल. त्यांच्या या इच्छेनंतर 1962 मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता.
Rockstar DSP On Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त रॉकस्टारने मानले खास व्यक्तीचे आभार !
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या जीवनाचे 40 वर्षे एका शिक्षकाच्या रूपात देशाला समर्पित केले होते. त्यांनी नेहमीच शिक्षकांच्या सन्मानावर भर दिला होता. एक खरा शिक्षक समाजाला योग्य दिशा दाखवण्यात महत्वाची भूमिका बजावतो असे त्यांना वाटत होते. एक खरा शिक्षक प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करायचा याचं ज्ञान शिष्यांना देत असतो. त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष करून समाज आणि सरकार दोघांनाही परवडणार नाही.
भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दीन म्हणून साजरा (World Teacher’s Day) केला जातो. तर जगातील काही देशांमध्ये ५ ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दीन साजरा केला जातो. सन १९९४ मध्ये युनेस्कोने (UNESCO) शिक्षकांच्या सन्मानार्थ ५ ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची घोषित केली. रशिया, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान, युके आणि इराण या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दीन साजरा केला जातो.
राज्यातील शालेय शिक्षकांना मोठा दिलासा; अशैक्षणिक कामे करणे बंधनकारक नाही; GR निघाला