लेट्सअप मराठीचं वृत्त सत्यचं; भाजपा प्रवक्त्याची दिवाळखोरी, नेटकऱ्यांनी धू-धू धुतला

तेलंगणामध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर पार पडल्या. ज्यात भाजपची अक्षरक्षः वाताहात झाली.

WhatsApp Image 2026 02 14 At 1.13.58 PM

WhatsApp Image 2026 02 14 At 1.13.58 PM

तेलंगणामध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर पार पडल्या. ज्यात भाजपची अक्षरक्षः वाताहात झाल्याचे समोर आल्याची पोस्ट लेट्सअप मराठीने शेअर केली होती. मात्र, तेलंगणा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर नव्हे तर, EVM झाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते प्रकाश गाडे यांनी करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. पण, गाडे यांचा हा दावा साफ खोटा असून, लेट्समराठीने दिलेले वृत्त खरे असून, कायदेशीर कारवाईचा इशारा देणाऱ्या गाडे यांनाच नेटकऱ्यांनी धू-धू धुवत त्यांच्या अकलेचे तारे काढले आहेत.

गाडे यांची पोस्ट नेमकी काय?

गाडे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर लेट्अपमराठीची पोस्ट शेअर करत त्यावर फेक असा स्टॅम्प मारला आहे. तसेच याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ज्यात गाडे यांनी देशात निवडणुका ह्या EVM वरच होतात! तेलंगणा निवडणूक ही Ballet पेपरवर झाली ही खोटी माहिती प्रसारित केल्या प्रकरणी ‘ LetsUpp Marathi आणि पैगंबर शेख यांनी जनतेची दिशाभूल करणारी खोटी माहिती पोस्ट केली यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारी माहिती प्रसारित केल्या प्रकरणी या दोघा विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ह्या अडाणचोट लोकांना एवढं कळत नाही, निवडणूक प्रक्रिया बदल करताना घटना दुरुस्ती करावी लागते. ही प्रक्रिया एवढ्या सहजतेने होत नसते. देशात निवडणूक ह्या फक्त आणि फक्त EVM मशिन्स वर होत असतात. काही नॉटी लोकांना जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याची सवय असते. म्हणून त्यांच्या खोडसाळपणा मोडुन काढण्यासाठी कायदेशीर अद्दल घडवणे देखील गरजेचं आहे. तेलंगणात झालेल्या निवडणुका हा Ballot पेपरवर झालेल्या नाहीत. या झालेल्या निवडणुकीत करीम नगर महानगरपालिका आणि निझामाबाद या महानगरपालिका मध्ये स्पष्ट बहुमत घेऊन सत्ता स्थापन करत आहे. काँग्रेसची सत्ता, मुस्लिम बहुल मतदार असताना सुद्धा भाजप या राज्यात शून्यातून वर येत आहे.. त्यामुळे काही चमन लोकांना याबद्दल माहिती नसेल तर माहिती घेऊन पोस्ट करावी. चमन लोकांनी थोडं कायद्याचा अभ्यास सुद्धा करावा..

गाडे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी धू-धू-धुतले

गाडे यांच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ज्यात अनेकांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहे. एक यूजरने टाईम्स ऑफ इंडियाची लिंक टाकली आहे. ज्यात आर बाबा पेपरमध्ये बातमी आलीये. पहिली कारवाई या वृत्तपत्रावर कर जी तू करू शकत नाही.मित्रा कशाला पोपट करून घेतो स्वतःचा, असा टोला लगावला आहे. निखिल खारकर यांनीदेखील इंग्रजी वृत्तपत्राची लिंक शेअर करत त्याखाली प्रकाश गाडे: तुला इंग्रजी वाचता येत की, नाही माहिती नाही पण, दम असेल तर, इथेपण कारवाई कर… नाहीतर उगाचच बडबड…

योगेश जाधव नावाच्या एका यूजरने अरे महामूर्ख पक्या, निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागते, ही जी तू ठुसकी सोडली आहेस, ती किती बालिश आणि बावळट आहे, हे तुझं तुला तर कळतंय का ? तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमेंट्समधील तुझे फॉलोअर्स किती अडाणी भोकाचे आहेत म्हणावे, तुमच्यासारख्या चुत्यांमुळे तो अडाणचोट कोबी देशाच्या उरावर बसलाय असे म्हटलं आहे. तर, कुणाल नावाच्या यूजरने प्रकाश गाडे आपल्या गावाच्या जवळच लागते तेलंगणा.. काही पाहुणे पण निवडून आलेले आहेत.. माझ्या माहितीसतव बॅलेट पेपर वर च झालेत निवडणूक तिथले..@प्रकाश गाडे चौकशी करून पोस्ट करावी आपण पण एकदा असा सल्ला देत गाडे यांच्या अकलेचे तारे काढले आहेत.
तर, संतोष आखाडे यांनी प्रकाश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपर वर होऊ शकतात ह्यात राज्य निवडणूक आयोग निर्णय घेत असतो असे सांगत घटना दुरुस्ती ची काहीही आवश्यकता नसते हे निदर्शनास आणून दिले आहे.

भाजपच्या आयटी सेलचा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न, सत्य लपवता येणार नाही – अतुल लोंढ

तेलंगणा राज्यात बॅलेट पेपरवर घेण्यात आलेल्या निवडणुकांचा निकाल अधिक पारदर्शक असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मतमोजणीनंतर काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले. या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, “भाजप ईव्हीएमवरून बॅलेट पेपरवर यायला तयार नाही. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता इतकीच प्रचंड असेल, तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात.” तेलंगणामध्ये जशी परिस्थिती दिसून आली, तशीच स्थिती देशभर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची पक्षनिहाय आकडेवारी ‘लेट्सअप मराठी’ने प्रसिद्ध केली होती. ही आकडेवारी फेक असल्याचा दावा भाजपच्या सोशल मीडिया विभागाकडून करण्यात आला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना लोंढे म्हणाले, भाजपच्या आयटी सेलने कितीही खोटं बोललं तरी लोकांना सत्य कळतंच. घाबरलेला भाजप आयटी सेलच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र त्यामुळे सत्य बदलणार नाही.”

लेट्सअपच्या संपादकांनी काढले वाभाडे

प्रकाश गाडे यांच्या पोस्टवर एकीकडे नेटकऱ्यांकडून त्यांच्या अकलेची कीव करत त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. तर, दुसरीकडे लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनीदेखील गाडे यांच्या पोस्टवर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, भारतीय जनता पक्षाकडे हुशार प्रवक्ते असतील असा समज होता. पण काहीजण व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू असल्याचे लक्षात येत आहे. यातील एक असेच प्रकाश गाडे या महाशयांनी स्वतःच विसंगत पोस्ट लिहिली आहे.

तेलंगणामध्ये महापालिकांच्या निवडणुका या बॅलेट पेपर वर झाल्या आहेत. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून थयथयाट चालवला आहे. स्वतः फार मोठा न घटनातज्ञ असल्याचा आव आणत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागते, असा बिनबुडाचा सल्ला देखील दिला आहे. काहीच कशाची माहिती नाही आणि हे गृहस्थ दुसऱ्यावर कारवाईचा इशारा देत आहेत. ठीक आहे तुम्ही कारवाई कराच. फक्त त्या आधी पोस्ट डिलीट करू नका. गाडे यांनी स्वतःच्या पोस्ट खालील कॉमेंट वाचल्याचे धाडस दाखवले तरी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे, यावर प्रकाश पडेल असे योगेश कुटे यांनी म्हटले आहे. एकूणच काय तर, देशात सत्तेत असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि प्रवक्त्यांना निवडणूक कशावर लढवल्या गेल्या आहेत हेच माहीत नसेल तर, उगाच प्रवक्त्यांनी बढाया मारू नये आणि स्वतःच्या अकलेची आणि पक्षाचे धिंडवडे काढू नये, आता बघूया नेटकऱ्यांनी अकलेची लख्तरं काढल्यानंतर गाडे यांनी ज्या पद्धतीने कायद्याची भाषा केली तसे ते झालेल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागतात का ते…

तेलंगणा बॅलेट पेपरबाबतचे सर्क्युलर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Cir.no.90_ 2026,_dt_12.01.2026_2483_compressed (1)_compressed
Exit mobile version