Temperature hike alert from IMD : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्यावर गेला नव्हता मात्र आता हा तापमानाचा पारा 42 अंशावर पोहचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उष्णतेची लाट…हवामान विभागाचा ‘या’ राज्यांना ‘हाय अलर्ट’
दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 अंशांची वाढ झाली आहे. तर आता हा पारा चाळीशी पार जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार उपस्थिती लावत उन्हाळ्यावर मात केली होती. आता मात्र खऱ्या विदर्भाच्या उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.