राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अखेर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून राज्यात संघटनेला बळ देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मजबूतीसाठी मंत्र्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचं टेन्शन वाढणार असल्याची शक्यता आहे. पक्षाच्या संघटनेसाठी खुद्द उपुमख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडे पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरु केल्यानंतर अजित पवार गटही चांगलाच सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे.
Sonam Kapoor : मला कामाची प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळते; सोनम करणार कमबॅक
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांसह 9 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलीयं. यामध्ये महत्वाची मानली जाणारी खाती अजित पवार गटाकडे असल्याचं दिसून येते. आता मंत्रिपदे मिळाल्यानंतर संघटनवाढीसाठी नेत्यांनी कंबर कसल्याचंच दिसून येत आहे. अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर विदर्भातली जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत राष्ट्रवादीच्या वाढीसाठी प्रयत्न करावं, लागणार आहे. तसेच मंत्री छगन भुजबळांवर नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरची, त्याचप्रमाणे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदूर्ग, अहमदनगरची जबाबदारी सोपवलीयं.
जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाईंना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित
धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, तर संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, तसेच अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला म्हणून सत्तेत मंत्रिपद भूषविणाऱ्या आमदार आदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, जिल्ह्यांची जबाबदारी दिलीयं.
संदीप क्षीरसागरांचे प्रमोशन! जिल्ह्याचा नेता म्हणत कौतुक अन् पवारांच्या शेजारची जागाही मिळाली
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती दिली आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार गटाने आपण इंडिया पक्षासोबतच राहणार असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर आता राज्यभर शरद पवार दौरा करीत असून पक्षाची पहिलीच स्वाभिमान सभा बीडमध्ये पार पडली. या सभेतून शरद पवारांकडून विरोधकांवर टीकेची तोफ डागली जात आहे. याविरोधात आता अजित पवार गटानेही आगेकूच केली असून आपल्या मंत्र्यांना विभागांची जबाबदारी देऊन संघटना मजबूत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून संघटनेच्या मजबूतीसाठी प्रयत्न केले जात असतानाच आता अजित पवार गटाने मंत्र्यांवर संघटनेची जबाबदारी सोपवलीयं. एकीकडे शिंदे-फडणवीस -पवार सरकार स्थापन झालं असून या सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट उभे ठाकले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काका-विरुद्ध पुतण्या अशी लढत होईल? अशा चर्चा मतदारांमध्ये रंगू लागल्या आहेत.