Kailas Patil : तुळजा भवानी मंदिरामध्ये व्हीआयपी पासचा बाजार मांडल्याचा (Kailas Patil) आरोप ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. मंदिरात दर्शनासाठी असलेल्या व्हीआयपी पासचा बाजार बंद करण्याची मागणी कैलास पाटील यांनी केली आहे.
Blackout : तांत्रिक बिघाडामुळे पोर्तुगाल स्पेनमध्ये अंधार; वीज पुरवठा खंडित, सर्व सेवा विस्कळित
पाटील पुढे म्हणाले, पास कुणाला दिला याची पक्की नोंद होत नाही, ते पेन्सीलने लिहलं जातं आणि तोच पास परत फिरून येतो. त्यामुळे तुम्ही कुणाला पास देता याची पक्की यादी संकेतस्थळावर पाहिजे. कारण यामुळे भाविकांची लूट होत असून देवस्थानदेखील बदनाम होत आहे. खरं तर हे पास बंद केले पाहिजेत, अशी मागणी पुजारी नागरीकांसह आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तुळजाभवानी मंदिरात असणारे काही पुजारी हे ड्रग्ज प्रकरणात संशयित आरोपी आहेत. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तुळजापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. श्री तुळजाभवानी मातेचे त्यांनी दर्शन घेतले; तसेच ड्रग्ज प्रकरणात यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश दिले होते. तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना ड्रग्ज प्रकरणातील संशयित पुजाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तुळजाभवानी मंदिरात कवायत ए-देवल कायद्यानुसार सदरची कारवाई होणार आहे.