कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, 11 रुग्णांना ICU बाहेर काढलं; अंजली दमानियांनी वादात सिव्हिल सर्जनलाही ओढलं
Anjali Damania Allegation Walmik Karad Get VIP Treatment : मस्साजोग आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) व्हिआयपी ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी X वर आरोप केलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल देखील वाल्मिक कराडच्या प्रकृतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, होटल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे? मला अशी माहिती मिळतेय की, डॉ. अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. ह्याची चौकशी व्हायला हवी.
जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आले…मग उपोषणाला बसले; भाजप आमदाराचा हल्लाबोल
संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली. आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीडमधे आगमन झालं असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
होटल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे ?
मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत.
ह्याची चौकशी व्हायला हवी.
त्यांच्याच खाली
१. संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले
२. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले.… pic.twitter.com/QoMm3QGK5o— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 26, 2025
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder) सूत्रधार असल्याचा ठपका वाल्मिक कराडवर ठेवण्यात आलाय. स्थानिक प्रशासनाकडून कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. कराडला काल रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सत्तेचा वापर…कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा
वाल्मिक कराडवर मिनी आयसीयू असलेल्या सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करण्यात आले होते. वाल्मिक कराडला या वॉर्डात ठेवण्यासाठी इतर रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. सुरक्षेचे कारण पुढे करून वाल्मिक कराडला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि पोलिस यांनी वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली म्हणून टीका केली जातेय.