जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आले…मग उपोषणाला बसले; भाजप आमदाराचा हल्लाबोल
BJP MLA Prasad Lad Criticize Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणमीसाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. कालपासून पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलंय. याप्रकरणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपा (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले की, जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील तेच विषय पुन्हा पुन्हा घेऊन उपोषणाला बसले आहेत. त्याला काहीच अर्थ नसून, केवळ समाजाच्या भावनांशी खेळण्याचा त्यांचा हा केवलीवाणा प्रयत्न आहे.
सत्तेचा वापर…कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा
राज्याची मागील दोन महिन्यात झालेली प्रगती, देशात क्रमांक १ चे राज्य म्हणून निर्माण होत असलेली ओळख आणि सर्वच स्तरावर होत असलेले कौतुक तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथून आलेली 16 लाख कोटींची गुंतवणूक, या सर्व राज्य हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांपासून लक्ष विचलित करण्यासाठी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, त्यांच्या आकांच्या आकाकडून उपोषणाचे हत्यार (Manoj Jarange Patil Hunger Strike) नव्याने उपसले गेले आहे.
राज्यातील मराठा समाजाला जे हवे आहे, ते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार द्यायला तयार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. परंतु मराठा समाज जरांगेंच्या नौटंकीच्या सोबत नाही. हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झालेले असताना देखील कोणाच्या आदेशावरून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत? हे त्यांनी सांगावे! अन्यथा राज्य सरकारने मराठा समाजासाठी आजवर काय केले? हे जाणून घेण्यासाठी चर्चेला यावं, असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत संदिप क्षीरसागरांचा मोठा दावा; म्हणाले, वाल्मिक कराड…
अन्यायकारी राजवट मोडणे या देशातल्या जनतेने मोडली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजासोबत दोषाच्या भावनांनी वागत आहेत. प्रजेच्या विरोधात आज सरकार वागतंय. आम्ही फक्त आरक्षणासाठी संघर्ष करत आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. अन्याय अत्याचार करणारं सरकार आहे, असंच वाटतंय. आता आम्ही फक्त आरक्षणासाठी संघर्ष करत आहोत. आम्ही सरकारला आरक्षण म्हणतोय, कुणाचाही बळी मागत नाही, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलीय.