राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, अजित पवारांनी दिल्या महत्वाच्या सूचना
Ajit Pawar Statment On Guillain Barre Syndrome : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा (Guillain Barre Syndrome) पहिला बळी गेल्याचं समोर आलंय. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, या आजारात मोठं बिल होतंय. पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलला देखील मोफत उपचार देणार असल्याचं अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं.
अवघ्या ४ तासांत २५ लाखांची मंजुरी कशी?, सैफच्या उपचारांवरून विमा कंपनीवर ‘AMC’ कडून तक्रार
काही ठिकाणी औषध महाग देत आहेत, नागरिकांचा आरोग्य चांगलं ठेवणं ही राज्य सरकारची देखील जबाबदारी आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटसाठी ससूनमध्ये देखील मोफत उपचार सुरू करण्याचा निर्णय उद्या मुंबई गेल्यावर चर्चा करून (Pune News) घेणार आहे. शहरातील दूषित पाणी या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत दोन्ही आयुक्तांशी बोलणं झालंय. प्रेस नोट काढून ते आपल्याशी बोलतील. पाणी पूर्णपणे उकळून प्यायचा सल्ला महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
अजित पवार म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत आत्ता एक छोटीशी बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, दर मंगळवारी आमची बैठक असते. त्या बैठकीत मी त्यांना विचारेन असं वक्तव्य त्यांनी केलं असेल तर ते योग्य नाही. त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झाला आहे, ते बघू.
‘संविधान हा आपल्या सामूहिक अस्मितेचा आधार’; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नाना पटोले यांच्या आंदोलनावर बोलताना अजित पवार म्हणाले की, हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. ज्याला कुणाला याबद्दल संशय येतो, त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी आमचे तहसीलदार काल गेले होते. त्यांचे निवेदन घेऊन तहसीलदारने सरकारकडे पाठवला आहे. काय मागण्या आहेत, काय निवेदन आहे, हे पाहून जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू असं त्यांनी स्पष्ट केलंय.
छावा सिनेमाच्या वादावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काल उदयराजेंनी त्यांच्या निर्मात्याला बोलवलं आहे. ज्या भागामधून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, ते मी कट करतो असं चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.