पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 73 रुग्ण, 14 जण व्हेंटिलेटरवर; आजाराचा धोका किती, घ्या जाणून
What Is Guillain Barre Syndrome 73 GBS Cases In Pune : राज्यातील प्रमुख शहर पुणे (Pune) येथे गुइलेन-बॅरे सिंड्रोम (What Is Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे सहा नवीन संशयित रुग्ण आढळून (Neurological Disorder) आले आहेत. या भागातील एकूण रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ते म्हणाले की, जीबीएस आजाराबाबत मुख्यमंत्र्यांना बोलेल. पण खर्च जास्त होत असेल तर यातून मार्ग काढेल, असं ते म्हणाले आहेत.
शासन सहभागाने सांगलीत ज्यूदो खेळाचं निपुणता केंद्र उभारणार; मंत्री चंद्रकांत पाटील
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसाप, गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या एकूण रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे. त्यात 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे. यापैकी 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला 24 संशयित प्रकरणे आढळल्यानंतर आरोग्य विभागाने अचानक वाढलेल्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) तयार केली आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेच्या एका भागावर हल्ला करते. या सिंड्रोममध्ये, स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या आणि वेदना, तापमान आणि स्पर्श संवेदना वाहणाऱ्या नसा प्रभावित होतात. ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. पाय किंवा हातांमध्ये संवेदना कमी होतात आणि गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.
शासन सहभागाने सांगलीत ज्यूदो खेळाचं निपुणता केंद्र उभारणार; मंत्री चंद्रकांत पाटील
ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ती प्रौढ आणि पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे, परंतु सर्व वयोगटातील लोक प्रभावित होऊ शकतात. अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, गुइलेन-बॅरे सिंड्रोम धोकादायक आहे, परंतु यामुळे महामारी किंवा साथीचा रोग होणार नाही.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) पुणे महानगरपालिका आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने बाधित भागांवर सक्रियपणे निरीक्षण करत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी आतापर्यंत शहर आणि ग्रामीण जिल्ह्यांतील 7,200 हून अधिक घरांचं सर्वेक्षण केलंय. पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण जिल्हे अशा अनेक भागात सर्वेक्षणाचे प्रयत्न करण्यात आलंय. आतापर्यंत पीएमसी हद्दीतील 1,943 घरे, चिंचवडमधील 1,750 घरे आणि ग्रामीण भागातील 3,522 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलंय.