प्रथमेश परब आणि पॅडी कांबळेच्या हॉरर कॉमेडी ‘हुक्की’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता वरुण धवनने 'हुक्की'चा पहिला लुक आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे...

  • Written By: Published:
News Photo   2025 11 08T211105.889

हॉरर-कॉमेडीपटांनी नेहमीच रसिकांना भुरळ घातली आहे. (Film) चार मित्रांची गोष्ट सांगणारा ‘हुक्की’ हा आगामी मराठी चित्रपटही  क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा आहे. ‘हुक्की’च्या पहिल्या पोस्टरनंतर या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दमदार कलाकारांची फौज आणि प्रवाहापेक्षा वेगळा विषय असल्याने ‘हुक्की’च्या फर्स्ट लुकने प्रदर्शित झाल्यापासूनच रसिकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर ‘हुक्की’च्या फर्स्ट लुकची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता वरुण धवनने ‘हुक्की’चा फर्स्ट लुक आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

निर्माते नितीन रोकडे, सुनंदा काळुसकर, विनायक पाष्टे, श्वेता संजय ठाकरे तसेच सहनिर्माते सुधीर खोत आणि रईस खान यांनी मॅजिक स्वान स्टुडिओज आणि एनएमआर मुव्हीज या बॅनरखाली ‘हुक्की’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथालेखनासोबतच ‘हुक्की’चे दिग्दर्शन नितीन रोकडे यांनी केले आहे. ‘हुक्की’चा फर्स्ट लुक खऱ्या अर्थाने रसिकांचा उत्साह वाढविणारा आहे. कावळ्याचा लालभडक डोळा उघडतो आणि फर्स्ट लुकची सुरुवात होते. त्यानंतर समुद्रकिनारी कोळी बांधव होडी ओढत असल्याचे दृश्य पाहायला मिळते. या दृश्यामागोमाग तीन तरुण आणि एक तरुणी यांची चौकडी चालत येत असल्याचे दिसते. त्यांना फोर लूझर्स असे संबोधले गेले आहे. त्यानंतर एक भयावह रात्र सुरू होते.

प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा! लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच

या रात्री चौघेही काहीशा विचित्र परिस्थितीत अडकतात. फर्स्ट लुक पाहिल्यावर ‘हुक्की’ या हॅारर कॅामेडीपटात प्रवाहापेक्षा वेगळे कथानक पाहायला मिळणार असल्याची जाणीव होते. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि विनोदाचा बादशाह पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. फर्स्ट लुक बाबत नितीन रोकडे म्हणाले की, ‘हुक्की’च्या कथानकाचा बाज लक्षात घेऊन फर्स्ट लुक तयार करण्यात आला आहे. हा फर्स्ट लुक अत्यंत कमी वेळात आपले काम चोख बजावणारा आहे. हॉरर-कॉमेडीपटासाठी पोषक ठरणारी वातावरणनिर्मिती, कलाकारांचा लूक, पार्श्वसंगीत, सबटायटल्स यांचा सुरेख वापर ‘हुक्की’च्या फर्स्ट लुकमध्ये आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सिनेमागृहांपर्यंत आणण्यात फर्स्ट लुक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी संदीप कुमार रॅाय आणि मधुलीता दास यांच्यासोबत ‘हुक्की’ची पटकथाही लिहिली आहे. अतिरीक्त पटकथा निनाद पाठक यांनी, तर संजय नवगिरे यांनी लिहिली आहे. या चित्रपटात प्रथमेश-पॅडीसोबत रावी किशोर, प्रशांत मोहिते, महेश पाटील, आरती चौबल, वर्षा धांदले, मोहक कंसारा आणि पंकज विष्णू आदी कलाकार आहेत. संगीतकार राघवेंद्र व्ही आणि प्रफुल-स्वप्नील यांनी या चित्रपटातील गीतरचना संगीतबद्ध केल्या असून साऊथमधील सुप्रसिद्ध संगीतकार राघवेंद्र व्ही ‘हुक्की’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. डिओपी फारुख खान यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, नृत्य दिग्दर्शन संतोष गणपत पालवणकर आणि इमरान मालगुणकर यांनी केले आहे. या चित्रपटातील थरारक साहस दृश्ये संष कुमार आणि नितीन रोकडे यांनी डिझाईन केली आहेत.

Tags

follow us