कराड ठणठणीत… ब्लड टेस्ट, CT स्कॅन, सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा; अंजली दमानिया आक्रमक
Anjali Damania Statement On Walmik Karad’s Health Report : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) तब्येत अचानक खालावल्याचं समोर आलंय. कराडला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याला अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत टीका केल्याचं समोर आलंय.
वाल्मिक कराड ठणठणीत आहेत.
खंडणी मागतांना, जीवे मारण्याच्या धमक्या देतांना, अगदी ठणठणीत होते ना? मग आशांना दया माया कशासाठी?
त्यांचे सगळे रिपोर्ट, ब्लड टेस्ट, CT स्कैन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा (with films). आणि त्यांची सगळ्यांची रवानगी आर्थर रोड ला करा pic.twitter.com/c8ViWQGLVj
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 25, 2025
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलंय की, वाल्मिक कराड ठणठणीत आहेत. खंडणी मागतांना, जीवे मारण्याच्या धमक्या देतांना, अगदी ठणठणीत होते ना? मग आशांना दया माया कशासाठी? त्यांचे सगळे रिपोर्ट, ब्लड टेस्ट, CT स्कैन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा (with films). त्यांची सगळ्यांची रवानगी आर्थर रोडला करा, अशी मागणी त्यांनी केलीय.
राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार; ‘या’ नेत्याचं नावं घेत राऊतांचा खळबळजनक दावा
सगळ्या गुन्हेगारांना पळण्याचा मार्ग रूग्णालय आहे. तसंच आता काहीसं करताना वाल्मिक कराड दिसत आहे. कराड यांना देखील आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलंय, अशी बातमी समोर आलीय. काही माध्यमांशी हे देखील दाखवलं की, ते तिथे व्यवस्थित बसलेले होते. आयसीयुमध्ये जे मॉनिटर्स कनेक्ट केले जातात, ते दिसले नाहीयेत. त्यामुळे माझी मागणी आहे की, ताबडतोब त्यांचे ब्लड टेस्ट, सगळे रिपोर्ट्स देण्यात यावे. त्या व्यतिरीक्त त्यांची सोनोग्राफी केली असल्यास त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा. कराडला काहीही झालेलं नाही, असा विश्वास अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय. सोबतच त्यांना आर्थर रोडला हलवण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी केल्याचं समोर आलंय.
वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, पुण्यात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 4 जण जखमी
महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले वाल्मिक कराड यांना पोटदुखीची तक्रार आल्यानंतर बीडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बुधवारी बीड न्यायालयाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बीड तुरुंगात नेल्यानंतर कराडने पोटदुखीची तक्रार केल्याचे सिव्हिल हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय. कारागृह प्रशासनाने रात्री बीड सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. यानंतर, डॉक्टरांच्या पथकाने तुरुंगात कराडची तपासणी केली अन् औषधे दिली.