राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार; ‘या’ नेत्याचं नावं घेत राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut : शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. (Sanjay Raut ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून दोन्ही बाजूने सतत आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होत असतात. अशातच राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर हा तिसरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचा असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं;संजय राऊत यांचा देशमुख हत्येवरून घणाघात
शिंदे सेनेवर प्रहार
मी हिंदुहृदयसम्राटांचा विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे असं सांगितलं जातं. मुळात बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्करायला शिकवलं नाही, असा पलटवार राऊतांनी केला. आज जो काही बूट चाटेपणा सुरू आहे. हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, महाराष्ट्राचं अध:पतन आणि उघड्या डोळ्यांनी पाहणारे लाचार राज्यकर्ते यात हे लोक सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हाती गेला आहे, असं मानतो असा घणाघातही राऊतांनी यावेळी केला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकनाथ शिंदे हे तर जयचंद
एकनाथ शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाहीत किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं हे ईडी, सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ज्याने महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलं आपली कातडी वाचवण्यासाठी. हे राज्याला माहीत आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे, त्यातून मतदार, संस्था आणि यंत्रणा विकत घेत आहात. त्यातून निवडणूक जिंकत आहात. असं राजकारण करत असाल तर बाळासाहेब अशा पैशाच्या राजकारणारा वेश्येचं राजकारण म्हणायचे अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा. काल मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत. उद्या तेही राहणार नाही. कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो. तो त्यांच्याच पक्षातील आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. मी नाव घेत नाही. पडद्यामागे सुरू आहेत. एका राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळणार आहे. यांचं वजन होतं कुठे. टायरमध्ये पंपाने हवा भरतात, तसे अमित शाहने तयार केलेले हे नेते आहेत, असा बॉम्ब त्यांनी टाकला.