Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोक्यात नक्की काय?, म्हणाले नवीन रुग्ण मिळाला की ऑपरेशन..

  • Written By: Published:
Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोक्यात नक्की काय?, म्हणाले नवीन रुग्ण मिळाला की ऑपरेशन..

Deputy Chief Minister Eknath Shinde : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) व उदय सामंत ही दोन नाव सध्या विरोधकांकडून जोरदार चर्चेत आहेत. महायुतीत बेबनाव, शिवसेनेत उदय सामंत वेगळा गट करून बाहेर पडणार अशा अशा स्वरूपाचे खळबळजनक दावे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. अशातच राजकीय ऑपरेशनवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील नाराज लोक फुटण्याची शक्यता आहे. सध्या याच्यामध्ये काही ऑपरेशन आहे का? असा प्रश्न विचारला असता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सध्यातरी नाही, एखादा रुग्ण मिळाला तर तुम्हाला सांगू. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तसंच काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काही राजकीय भूकंप घडवणारी घटना राज्याच्या राजकारणात घडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना अन् शरद पवारांची राष्ट्रवादी लवकरच; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी आणलेल्या गुंतवणुकीचे माहिती देतानाच उदय सामंत यांनी मोठी राजकीय ब्रेकिंग दिली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेल्या 15 दिवसात उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार काँग्रेसचे पाच आमदार उद्धव ठाकरे गटाचे तीन खासदार यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली आहे. याचा रेकॉर्ड देखील आहे असाही दावा सामंत यांनी केला आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःच अस्तित्व टिकवून आपला उदय व्हावा यासाठी माझ्या नावाचा वापर करत असल्याची टीका सामंत यांनी केली आहे. यापेक्षा त्यांनी जे चालले आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करावा असाही उपरोधिक टोला उदय सामंत यांनी संजय राऊतांना लगावलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube