Pune News : ‘पब’चा अजब कारनामा! पार्टीत कंडोम अन् ओआरएसचं वाटप; आयोजकाचा युटर्न

Pune News : ‘पब’चा अजब कारनामा! पार्टीत कंडोम अन् ओआरएसचं वाटप; आयोजकाचा युटर्न

Pune News : नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्रच जय्यत तयारी सुरु आहे. अशातच पुण्यातील मुंढव्यातील एक पबचा भलताच कारनामा समोर आलायं. नवीन वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये तरुणांना कंडोम (Condom) आणि ओआरएसचे (ORS) पाकीट देण्यात आल्याचा प्रकार घडलायं. मुंढव्यातील हाय स्पिरीट या पबकडून या पार्टीसाठी निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे सर्वच स्तरातून चौफेर टीका होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या प्रकारावर चौफेर टीका झाल्यानंतर आता आयोजकाने थेट पार्टीच रद्द करण्याच निर्णय घेतलायं. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय? हे आपण समजून घेऊयात…

ऑलिम्पिकमधील ‘सुवर्ण’वीर मुंबईत चालवतोय टॅक्सी; युवा उद्योजकानं ‘हिरा’ शोधूनच काढला

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जय्यत तयारी करीत आहेत. मोठ-मोठ्या शहरांमधील पबमध्ये पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या पार्ट्यांमध्ये तरुणाई बेधुंद होऊन साजरा करीत असतात. या तरुणाईला आपल्या पबकडे आकर्षित करण्यासाठी पबकडून एक शक्कल लढवण्यात आलीयं. थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणांना कंडोम आणि ओआरएसच्या पाकीटांचं वाटप करण्यात आलंय.

आता चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाही; पैसे पाठविणाऱ्यांचे नाव येणार; RTGS-NEFT साठी आरबीआयचा मोठा निर्णय

पबच्या या अजब कारनाम्यामुळे पुण्यासह राज्यभरात याची चांगलीच चर्चा झाली. या प्रकाराची दखल पुणे युवक काँग्रेसकडून घेण्यात आलीयं. युवक काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्तालयाडे तक्रार करण्यात आलीयं. पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिटकडून नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह ओआरएसचे वाटप केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे, अशी तक्रार करण्यात आली.

फरार वाल्मिक कराड पोलीस दलातील अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला?, फोटो समोर

युवक काँग्रेसच्या तक्रारीनंतर पोलिसांनीही या प्रकाराची दखल घेत चौकशी केलीय. चौकशीअंती तरुणांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबकडून करण्यात आलायं. मात्र, या प्रकरणानंतर सर्वत्रच टीका होत असल्याने पार्टीच्या आयोजकाने पार्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलायं. त्यामुळे आता ही पार्टी होणारच नसल्याचं समोर येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube