आता चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाही; पैसे पाठविणाऱ्यांचे नाव येणार; RTGS-NEFT साठी आरबीआयचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
आता चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाही; पैसे पाठविणाऱ्यांचे नाव येणार;  RTGS-NEFT साठी आरबीआयचा मोठा निर्णय

Reserve Bank of India Circular For RTGS-NEFT: अनेक वेळा बँक ग्राहकांकडून आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटीद्वारे (NEFT) ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना चुका होतात. त्यातून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना कमी करण्यासाठी व फसवणुकीलाही आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करण्यासाठी नवी सुविधा आणलीय. आता व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी पैस ट्रान्सफर करणारा व्यक्ती प्राप्तकर्त्याच्या नावाची पडताळणी करणार आहे. RBI ने ‘लाभार्थी खातेदार’ शोधण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

… तरीही बायको सोडून गेली तर? वर्क लाईफ बॅलन्सबद्दल उद्योगपती गौतम अदानी स्पष्टच बोलले

आरटीजीएस अथवा एनईएफटी प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींना, असा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यासोबत नोंदवलेल्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकने दिले आहेत. या संदर्भातलं परिपत्रकही बँकेने आज जारी केले. आरटीजीएस आणि एनईएफटीचे थेट किंवा उपसदस्य असलेल्या सर्व बँकांनी येत्या 1 एप्रिल 2025 पर्यंतही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेनं केली आहे.

‘नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी…’; वर्षा गायकवाड यांची मागणी

ही सुविधा सुरू झाल्यानंतर पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींनी लाभार्थ्यांचा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड भरल्यानंतर, लाभार्थ्याचे बँक खात्यात नोंद असलेले नाव आपोआप दिसणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांमध्ये त्यांचे पैसे योग्य व्यक्तीला जात असल्याबद्दलचा विश्वास वाढेल आणि फसवणुकीची शक्यताही कमी होईल, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सध्या यूपीआय (UPI) किंवा इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (IMPS) पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याची ओळख पडताळण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण ही सुविधा आरटीजीएस किंवा एनईएफटी प्रणालीमध्ये उपलब्ध नव्हती. मागील चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या सुविधाबाबत निर्णय घेतला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube