पबने नववर्षाच्या स्वागतासाठी निमंत्रणासोबत पाठवलं कंडोम, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पबने नववर्षाच्या स्वागतासाठी निमंत्रणासोबत पाठवलं कंडोम, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Condom Giveaway At New Year Party In Pub In Pune : राज्यभरात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी (New Year Party) सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून (Pub) नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत.

तरुणांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली (Pune News) आहे. या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र, कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

….अन्यथा मुख्यमंत्री फडणवीस साहेब लग्नासाठी तुम्हीचं मुली शोधून द्या, तरुणांचं अनोख आंदोलन

दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना ( New Year Party In Pub) निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे,” असे या पत्रात लिहले आहे.

ही महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार -आठवले

“अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे,” असं सुद्धा या पत्रात नमूद आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुण्याच्या एका पबने अनेकांना निमंत्रण पाठवले आहे. त्या निमंत्रण पत्रिकासोबत पाठवलेल्या या भेटवस्तूमुळे मोठा वाद निर्माण झालाय.

गर्दीच्या ठिकाणी योग्य बंदोबस्त आहे.  23 ड्रंक एंड ड्राइव मोहीम राबवण्यात येणार आहे. अधिकृत ठिकाणांना परवानगी देण्यात आली आहे. पहाटे 5 पर्यंत दारू दुकानांना परवानगी देण्यात येणार आहे. ड्रग्ज आणि अल्पवयीन व्यक्तींना दारू न देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. या सगळ्या नियमांचं पालन ना करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube