CBI ची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये छापेमारी, पासपोर्ट सेवा केंद्रातील 32 जणांविरोधात गुन्हे दाखल
Passport Seva Kendra Corruption : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज्यात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पासपोर्ट सहाय्यक, पासपोर्ट सेवा केंद्रांचे वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यक आणि एजंटसह 32 आरोपींविरुद्ध 12 गुन्हे दाखल केले. या प्रकरणात मुंबई आणि नाशिकमध्ये तब्बल 33 ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharahstra | CBI registers 12 cases against 32 accused including Passport Assistants, Senior Passport Assistants of Passport Seva Kendras and agents on the allegations of collusive corruption. Searches were conducted at 33 locations in Mumbai and Nashik
— ANI (@ANI) June 29, 2024
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पासपोर्ट सेवा केंद्रातील अधिकारी कथितरित्या पासपोर्ट सुविधा एजंटच्या संपर्कात असून बनावट कागदपत्रांवर पासपोर्ट जारी करण्याचे काम पासपोर्ट सेवा केंद्रातील काही अधिकारी करत असल्याची माहिती सीबीआयला प्राप्त झाली होती.
पुण्यातील अनधिकृत पब, बार अन् हॉटेल्सवर बुलडोजर; सीएम शिंदे अॅक्शन मोडमध्ये…
या माहितीच्या आधारे सीबीआयने मुंबई आणि नाशिकच्या 33 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत सीबीआयने अनेक दस्तऐवज, डिजिटल पुरावे जप्त केले असून पासपोर्ट सेवा केंद्रांचे वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यक आणि एजंटांसह 32 आरोपींविरुद्ध 12 गुन्हे दाखल केले आहे.
माहितीनुसार सीबीआयने मुंबईतील परेल, मालाड ही कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणात सीबीआयकडून पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Crop Insurance Scheme : आगाऊ पैसे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करणार; कृषिमंत्री मुंडेंचा इशारा
हे अधिकारी बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट देण्याचे काम करत होते. त्यानंतर काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात येत होते अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.