Crop Insurance Scheme : आगाऊ पैसे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करणार; कृषिमंत्री मुंडेंचा इशारा

Crop Insurance Scheme : आगाऊ पैसे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करणार; कृषिमंत्री मुंडेंचा इशारा

Crop Insurance Scheme : गेल्यावर्षी प्रमाणेच खरीप हंगाम 2024 साठी राज्य सरकार यंदाही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) राबवत आहे. सरकारकडून या योजनेचा मोठा गाजावाजा केला जातोय. मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक (CSC Center) हे शेतकऱ्यांकडून एक रुपयापेक्षा जास्त रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या. याची कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी गंभीर दखल घेतली आहे.

RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी घेतली अंबानी कुटुंबाची भेट 

आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यांसह तक्रार आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

अजितदादांना सोबत ठेवायचं की नाही पक्ष ठरवेल, आमदार कुल यांचं विधान 

सरकारने विमा अर्ज भरण्यासाठी CSC केंद्रांना प्रति शेतकरी 40 रुपये मानधन निश्चित केले आहे. हे मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत CSC विभागाला दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा अर्ज भरताना केवळ एकट रुपया शुल्क म्हणून भरायचे आहे. मात्र,
मात्र काही केंद्र चालक सात-बारा ऑनलाइन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांकवर (9822446655) थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे.

सदर केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुंडे यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज