RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी घेतली अंबानी कुटुंबाची भेट

RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी घेतली अंबानी कुटुंबाची भेट

Anant-Radhika Wedding : सध्या अंबानी कुटुंबातील सदस्य पाहुणे मंडळींना आमंत्रण देताना पाहायला मिळत आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. (Anant-Radhika) 12 जुलैला दोघांचा मोठ्या थाटामाटात हिंदू पद्धतीने लग्न होणार आहे. (Ambani) त्यामुळे सध्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच लग्नाआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अंबानी कुटुंबाची भेट घेतली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भूमिकेसाठी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल, सईने सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव

कुटुंबाने स्वागत केलं

या व्हिडीओत, मोहन भागवतांसह उपस्थितीत असलेल्या पाहुण्यांचं मुकेश अंबानी स्वागत करताना दिसत आहेत. तसंच केशरी रंगाच्या कुर्त्यात असलेला अनंत अंबानी खाली वाकून पाय पडताना पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे अंबानी कुटुंबाने मोहन भागवतांचं स्वागत केलं. तसंच, अंबानी कुटुंबाने एकत्र येऊन मोहन भागवतांना निरोपही दिला. यावेळीही अंबानी कुटुंबातील सदस्य मोहन भागवतांचे आशीर्वाद पुन्हा एकदा घेताना पाहायला मिळाले.

वंचितांचा विवाह सोहळा ..त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, अनधिकृत पब, बारवरील कारवाईर मराठी अभिनेत्याची पोस्ट

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी मुकेश अंबानींनी वंचितांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. २ जुलैला सायंकाळी ४.३० वाजता पालघर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात हा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी व पत्नी नीता अंबानी उपस्थित राहणार आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज