..त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, अनधिकृत पब, बारवरील कारवाईर मराठी अभिनेत्याची पोस्ट

..त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?, अनधिकृत पब, बारवरील कारवाईर मराठी अभिनेत्याची पोस्ट

Actor Saurabh Gokhale :पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणानंतर महाराष्ट्रातील ठिकठिकाणी अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचं सत्र जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. (Saurabh Gokhale) पुणे, ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदार अशा अनेक ठिकाणी असलेल्या अनधिकृत पब, बारवर संबंधित महापालिकेकडून हातोडा टाकला जात आहे. यासंदर्भात अभिनेता (Marathi Movie) सौरभ गोखलेनं एक चपखल अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अनोख्या शैलीत पोस्ट शेअर Urmila Kothare : उर्मिलाचा पांढऱ्या फ्लोरल प्रिंट वन पिस ड्रेसमधील मोहक लूक

‘राधा ही बावरी’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला सौरभ गोखले सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सौरभ नेहमी आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर परखड मत मांडत असतो. सध्या अनेक महापालिका अनधिकृत पब व बारची झाडाझडती घेऊन कारवाई करत आहेत. यावरही सौरभनं आपल्या अनोख्या शैलीत पोस्ट शेअर केली आहे. तो नेमकं काय म्हणाला?…

काय आहे पोस्टमध्ये?

अभिनेता सौरभ गोखले इन्स्टाग्राम स्टोरीवर व्यक्त झाला आहे. या स्टोरीमध्ये त्यानं लिहिलं आहे, ‘शहरातील अनेक अनधिकृत पब आणि बारवर महापालिकेची कारवाई!…पण हे अनधिकृत बार आणि पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिलं त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी?’ अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. याआधी सौरभनं सोशल मीडियावर ‘all eyes on rafah’ या आशयाचे स्टेटस टाकणाऱ्यांची खिल्ली उडवली होती. ‘स्वतःच्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचं पोर शाळेत जाऊ शकतं की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण आमचं स्टेटस मात्र ‘all eyes on rafah,’ अशी पोस्ट त्यानं इन्स्टाग्रामवर केली आहे.

 नथुराम गोडसे भूमिका भूमिकेसाठी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल, सईने सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव

सौरभ गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं मराठी मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका निभावल्या होत्या. एवढंच नव्हेतर त्यानं आपल्या अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीतही उमटवली आहे. तसंच, सौरभ मराठी रंगभूमीवरही अविरत काम करत आहे. सध्या त्याचं प्रदीप दळवी लिखित व विवेक आपटे पुनदिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकात त्यानं मुख्य नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. यात सौरभसह आकाश भडसवाळे, चिन्मय पाटसकर, अमित जांभेकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्नील कुलकर्णी, गौरव निमकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज