Saurabh Gokhale : भेदक नजर, हातात बंदूक अन् आक्रमक बाणा… सौरभ गोखलेच्या फौजी लूकची चर्चा

Saurabh Gokhale : भेदक नजर, हातात बंदूक अन् आक्रमक बाणा… सौरभ गोखलेच्या फौजी लूकची चर्चा

Saurabh Gokhale: आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale) यानी सिनेमासृष्टी व जाहिरात विश्वामध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण केले आहे. आजवरच्या आपल्या अनेक भूमिकेमधून वेगळेपणा जपत चाहत्यांना मनमुराद आनंद देणारा (Saurabh Gokhale marathi movie fauji) हा अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. कमांडोच्या वेशातील सौरभचा हा नवा लूक सोशल मीडियावर (Social media) नुकताच समोर आला आहे. (actor saurabh gokhale film fauji will release soon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saurabh Gokhale (@sauraabhgokhaale)


आगामी ‘फौजी’ या मराठी सिनेमामध्ये एका निडर सैनिकाची भूमिका तो साकारत असल्याचे दिसून येत आहे. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम येडे निर्मित आणि दिग्दर्शित ‘फौजी’ (Fauji) देशाचा प्राण, ‘आन बान शान’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘फौजी’ सिनेमाच्या निमित्ताने मला सैनिकाची भूमिका साकारायला मिळाली आहे, त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग सध्या मी घेत असल्याचे त्याने सांगितले आहे.

देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकाची भूमिका साकारणं हे माझ्या अभिनेत्यासाठी आनंददायी तितकेच आव्हानात्मक असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे, असं सौरभ ‘फौजी’ सिनेमामधील भूमिकेबाबत स्पष्ट केला आहे. अभिनेता सौरभ गोखले याच्याबरोबर प्राजक्ता गायकवाड, नागेश भोसले, शहाबाज खान, अरुण नलावडे, कल्याणी चौधरी, संजय खापरे, अश्विनी कासार, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, जयंत सावरकर, सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे इत्यादी कलाकार फौजी या सिनेमामध्ये दिसून येणार आहेत. फौजी या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉट बॉय ते निर्माता दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ या सिनेमात चाहत्यांसाठी आणला आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद गीते घनशाम येडे यांची आहे. छायांकन मोहन वर्मा तर संकलन विश्वजीत दोडेकर यांनी केले आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube