Nita Ambani : मुलगा अनंतच्या लग्नासाठी नीता अंबानी नेसणार ‘सोन्याची’ साडी; वाराणसीत होतेय तयार…
Nita Ambani Gold Saree: देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी (Nita Ambani) मुलगा अनंत अंबानीच्या (Anant Ambani) लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. पुढील महिन्यात 12 जुलै रोजी अनंत राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant)सात फेऱ्या करणार असून, त्याकडे देश-विदेशाच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान नीता अंबानी आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन काशी विश्वनाथ मंदिरात (Kashi Vishwanath Temple) पोहोचल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांनी विश्वनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच नीता अंबानींसाठी काशी आणखी एका कारणासाठी खास ठरली आहे.
View this post on Instagram
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नीता आपल्या मुलाच्या लग्नात जी साडी घालणार आहे, ती साडी काशीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून तयार केली जात आहे आणि ती सोन्याच्या तारांनी बनवली जात आहे. खरं तर ज्या दिवशी नीता अंबानी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन काशीला पोहोचल्या, त्याच दिवशी त्यांनी रामनगरमधील साहित्यनाका येथे असलेल्या विणकर विजय मौर्य यांच्या हातमागात तयार होणाऱ्या साड्या देखील पाहून घेतल्या आहेत. तिने कारागिरांकडून तिच्या साडीत वापरल्या जाणाऱ्या सर्व साहित्याची माहिती घेतली आणि त्यांच्याशी थोडा संवादही केला.
नीता अंबानी आपल्या मुलाच्या लग्नात सोन्याची साडी घालणार
यावेळी नीता अंबानी यांनी तिथे बनवल्या जाणाऱ्या साड्यांवर केलेली उत्कृष्ट कारागिरीही पाहिली. याआधी त्यांनी बनारसमधील अनेक व्यापारी आणि कारागिरांना हॉटेलमध्ये बोलावून त्यांनी प्रदर्शनासाठी आणलेल्या साड्या पाहिल्या. तिने वेगवेगळ्या विणकरांकडून काही साड्यांच्या ऑर्डर्स बुक केल्या. रामनगर साडी विणकर अंगिका कुशवाह, जी वस्त्रोद्योगात सर्वात उत्तम मानले आहे,’नीता अंबानींनी आमची ‘लक्का बूटी’ साडी निवडली, जी पारंपारिक ‘कढुआ’ म्हणून बनविली जाते, ज्यामध्ये एक लाख बूटी वापरले आहेत.
100 हून अधिक साड्या पाहिल्या
विशेष बाब म्हणजे उत्तर प्रदेश इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह फेडरेशन (UPCF) चे अध्यक्ष असलेले तिचे वडील अमरेश कुशवाह म्हणाले की,’नीता अंबानी यांनी लग्न समारंभासाठी अनेक विणकरांकडून वेगवेगळ्या पॅटर्नच्या 100 हून अधिक साड्या मागवल्या होत्या.’ ‘रिलायन्स स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून बनारसी विणकाम जागतिक केले जाईल’, असेही ते म्हणाले. पाचव्या पिढीतील विणकर विजय मौर्य यांचा मुलगा अनिकेत म्हणाला, ‘त्यांची साडी सोन्याच्या तारेने बनवली जात आहे. याला खरी झारी आणि परीक्षित जरी म्हणतात.
Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन
काशी विश्वनाथ येथे दर्शन व पूजा
त्यांनी असेही सांगितले की, ‘मुलगा अनंत आणि राधिकाच्या लग्नात नीता अंबानी आणि तिची आई या साड्या घालणार आहेत.’ एवढेच नाही तर या साडीला लूक आउट करण्यावर बंदी आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिर आणि माँ अन्नपूर्णा मंदिराला अनुक्रमे 1.5 कोटी आणि 1 कोटी रुपये दान केले. यानंतर त्यांनी संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीमध्येही भाग घेतला, त्यानंतर त्यांनी काशीतील एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये चाटचा आनंदही घेतला, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.