Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन

Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन

Anant Ambani Birthday Bash With Radhika Merchant : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून अंबानी कुटुबांची (Ambani Family) यांची ओळख आहे. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) मोठ्या थाटात उद्धाटन सोहळा पार पडला. आता अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटबरोबर (Radhika Merchant) दुबईत (Dubai) बर्थडे सेलिब्रेशन केले आहे.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा चिरंजीव अर्थात अनंत अंबानी 28 वर्षांचा झाला आहे. 10 एप्रिल 2023 रोजी दुबईमध्ये त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले होते. अनंत अंबानीने राधिका मर्चंटबरोबर दुबईमध्ये त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. अनंत अंबानीच्या वाढदिवसाचे दुबईमध्ये मोठं सेलिब्रेशन करण्यात आले आहे. या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय गायक आतिफ असलमचा (Atif Aslam) खास परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता.

आता अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अनंत अंबानी दरवर्षी आपला वाढदिवस कुटुंबीय आणि जवळच्या मित्र- मंडळींच्या उपस्थितीत साजरा करत असतात. या वेळेस देखील त्यांनी दुबईमध्ये जवळचे कुटुंबीय आणि खास मित्र- मैत्रिणींच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा केला आहे.

अंबानी फॅन पेजवरचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनंत अंबानीची होणारी पत्नी अर्थात राधिका मर्चंट तिच्या मित्र- मंडळींबरोबर दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ती खूपच आनंदी दिसून येत आहे. राधिका तिच्या मित्र- मंडळींबरोबर दुबईमध्ये अनंत अंबानीचा वाढदिवस साजरा करत आहे, असं म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

Deepak Dobriyal : सात हजार रुपयांचे कर्ज घेऊन आला होता हा अभिनेता, ‘भोलात’ आश्र्वस्थामाचा रोल केला अन्…

अनंत अंबानीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आतिफ असलमचा (Atif Aslam) मस्त परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. त्याच्या या खास परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच गायक राहत फतेह अली खानने देखील ‘बॉडीगार्ड’ या सिनेमात ‘तेरी मेरी’ हे गाणं गात अनंत अंबानीचा वाढदिवस खास केला आहे. तसेच अनेक लोकप्रिय गायक आणि रॅपर यांनी देखील आपल्या गाण्याने वाढदिवसाची शोभा वाढवली होती.

अनंत अंबानी यांनी त्यांचा २७ वा वाढदिवस रिलायन्स टाउनशिपच्या रिफायनरीमध्ये साजरा केला होता. त्या कार्यक्रमाला बॉलिवूडचे लोकप्रिय गायक शान सोबतच विनोदवीर सुगंधा मिश्रा यांच्या परफॉर्मन्सचे आयोजन करण्यात आले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यावर चाहते देखील आता त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. अंबनींच्या फॅमिलीच्या काही कार्यक्रमात राधिकाला स्पॉट करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube