Mukesh Ambani : मुकेश अंबानींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; ई मेल पाठवत 20 कोटींची मागणी

Mukesh Ambani : मुकेश अंबानींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; ई मेल पाठवत 20 कोटींची मागणी

Mukesh Ambani : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्याकडे वीस कोटी रुपये खंडणीची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ई मेल आयडीवर धमकीचा ई मेल पाठवला होता. तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत, असे या ई मेलमध्ये म्हटले होते.

हा मेल मिळाल्यानंतर अंबानी यांच्या सुरक्षा यंत्रणेने गावदेवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकाराने राज्याच्या उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. अंबानी यांनी याआधी मागील वर्षीही अशीच धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी ही धमकी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

अंबानी यांना धमकीची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अंबानींच्या अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली गेली होती. तसेच त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. अंबानींच्या सुरक्षिततेचा विचार करता त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे. याआधी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाउंडेशन उडवून देण्याची तसेच अंबानींच्या कुटुंबियांसंदर्भात धमकी दिली होती.

Uddhav Thackeray : ‘पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं?’ ठाकरे गटाचा थेट सवाल

देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांनी आता गौतम अदानी (Gautam Adani)यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023)प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती बनले आहेत. हिंडेनबर्गच्या (Hindenburg)अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube