माधुरीची घरवापसी होणार! अंबानींचा यू-टर्न

Madhuri will Return to Nandani Math Kolhapur : गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी मठ (Nandani Math)आणि स्थानिक भाविकांसाठी आस्थेचा, श्रद्धेचा आणि आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेली… माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर मठात परत येणार आहे. वनतारा, मठ प्रशासन आणि राज्य शासन (Madhuri Elephant) यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय चर्चेनंतर या ऐतिहासिक घरवापसीवर शिक्कामोर्तब झालंय. गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये हलवलेली कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण माधुरी, लवकरच नांदणी मठात परतणार आहे. नांदणी मठ प्रशासन, वनतारा आणि राज्य शासन यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय (Ambani) घेण्यात आलाय.
हत्तींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारणार
न्यायालयीन प्रक्रियेनंतर महादेवीला पुन्हा कोल्हापूरात आणले जाईल, अनंत अंबानी यांनी लोकभावनेचा आदर करून हा निर्णय घेतला, अशी माहिती वनतारा संस्थेचे सीईओ विहान करणी यांनी दिली. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर नांदणी मठाजवळ हत्तींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारले जाणार असून, त्याचे मालकी हक्क मठाकडे राहतील. व्यवस्थापन मात्र वनतारा करणार असल्याचं कळतंय. महादेवी केवळ हत्तीण नाही, ती आमच्या श्रद्धेची मूर्ती आहे, असं भावनिक वक्तव्य मठाचे जिनसेन स्वामी यांनी केलंय. त्यांनी अंबानी अन् वनताराने घेतलेल्या निर्णयाचं सुद्धा कौतुक केलंय. गेल्या काही महिन्यांपासून महादेवीच्या स्थलांतराला विरोध करणाऱ्या स्थानिक भाविकांची भावना अखेर शासनाने ऐकली, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
न्या. यशवंत वर्मांना SC चा झटका, कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली, महाभियोगाला हिरवा कंदील
अनंत अंबानी यांची भूमिका काय?
आम्हाला माधुरी हत्तीणीच्या धार्मिक अन् सांस्कृतिक महत्वाची जाणीव आहे. या भावनांचा आम्ही आदर करतो. जैन मठ अन् महाराष्ट्र शासन महादेवीला परत आणण्यासाठी न्यायालयात अर्ज करत असतील, तर वनतारा त्यांच्यासोबत राहील. महादेवीच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यास आमचे प्रथम प्राधान्य राहील, असं अनंत अंबानी यांनी म्हटलंय.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, माधुरीचा ताबा घ्यायचा नव्हता, तिची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांच्या या भूमिकेला दिल्लीतही प्रतिसाद मिळाल्याचं दिसतं. खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर राज्य शासन लवकरच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेवीला नांदणी मठात परत आणण्यात येणार आहे.
Tariff War : ‘तारिफ’ चा टॅरिफ झाला अन् वसुलीला सुरूवात झाली; टॅरिफ लादण्याची 5 मोठी कारणे
हत्ती, न्याय, आणि श्रद्धा… या तिन्हींच्या सीमारेषांवर चाललेलं हे नाट्य अखेर एका सकारात्मक निर्णयावर पोहोचलंय. महादेवीच्या घरवापसीच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांत आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आता महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यात येईल, मठ परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘हत्ती पुनर्वसन केंद्र’ उभारलं जाईल. परंतु दुसरीकडे सोशल मीडियावर पुन्हा एकदा पोस्ट अन् कमेंट्सचा पूर आलाय…कोण म्हणतंय सेटलमेंट झाली, अंबानीच्या वनताराने कोल्हापुरच्या नांदणी मठासोबत डील केलीय… तुम्हाला काय वाटतं? खरंच सेटलमेंट झाली का? कॉमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा.