हत्तीणीला नांदणी मठातून हलवण्याची शेट्टीचीच मागणी; पत्र व्हायरल होताच राजू शेट्टींचा खुलासा

हत्तीणीला नांदणी मठातून हलवण्याची शेट्टीचीच मागणी; पत्र व्हायरल होताच राजू शेट्टींचा खुलासा

Raju Shetty on Madhuri Elephant of Nandani Math letter viral of demand to move : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात चर्चेत असणारी नांदणी मठातील (Nandani Math) महादेवी हत्तीण (Mahadevi Hattini) अखेर गुजरातच्या (Gujarat) वनताराकडे (Vantara) जाण्यासाठी रवाना झाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महादेवी हत्तीण गुजरातला रवाना झाली आहे. मात्र त्यामध्ये अंबानींनी दबाव आणून ही हत्तीण नेली असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील या हत्तीणीला मठातून हलवण्यासाठी दिलेले पत्र व्हायरल होत होते. त्यावर आता राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?

नांदणी मठाची महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीण वनविभागाने घेऊन जावे. या आशयाचे 2018 सालातील माझे पत्र सोशल मिडीयात व्हायरल केले जात आहे. काय वस्तुस्थिती आहे या पत्राची ? 2018 साली नांदणी मठातील हत्तीणीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहुत हदयविकाराच्या तीव्र झटक्याने आजारी पडला होता. डॅाक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. दरम्यान माधुरीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित माहुत नसल्याने नांदणी मठाच्या विश्वस्तांनी मला माहुत मिळेपर्यंत काही दिवसासाठी सदरचा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्तीकेंद्रात सोडण्याबाबत विनंती केली होती.

कलाकारांनो सज्ज व्हा! 22 वा Third Eye आशियाई चित्रपट महोत्सव, प्रवेशिका सुरू

त्यानुसार मी 2018 साली वनविभागास पत्रव्यवहार केला. मात्र वनविभागाने या गोष्टीस असमर्थता दर्शविले. त्यानंतर थोड्या दिवसांनी इस्माईल या माहुतास अथक प्रयत्नातून नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले. त्यादिवसापासून ते आजअखेर माधुरीची चांगल्या पध्दतीने देखभाल व काळजी घेतली गेली आहे. काही मंडळी खोडसाळपणाने राजकीय आकसापोटी माझे 2018 साली वनविभागास देण्यात आलेले पत्र आता सोशलमिडीयावर व्हायरल केले जात आहे. पण आम्ही माधुरीला परत आणल्याशिवाय राहणार नसल्याचं शेट्टी म्हणाले आहेत.

प्रकरण काय?

मिरवणुकीसाठी वन विभागाकडून परवानगी न घेता महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप ‘पेटा’ ने केला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर चैकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने हत्तीणीची पाहणी करुन अहवाल सादर केला होता. या अहवालात प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवल होतं.

सपकाळांचा ‘नवा खेळ’ चर्चेत! नाना पटोलेंच्या जवळच्या लोकांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून डच्चू?

त्यानंतर नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महादेवी हत्तीण गुजरातला रवाना झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube